Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र ई - बाईक सेवेला मुंबईकरांची पसंती, एक लाख प्रवाशांची 'बेस्ट' नोंदणी

ई – बाईक सेवेला मुंबईकरांची पसंती, एक लाख प्रवाशांची ‘बेस्ट’ नोंदणी

Subscribe

मुंबई – मुंबईसारख्या शहरात कामाच्या ठिकाणी वाहतूक कोंडीतून वाट काढत लवकर पोहोचण्याच्या उद्देशाने बेस्ट उपक्रमाने २२ जूनपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या ई – बाईक सेवेला प्रवाशांकडून दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या साडेतीन महिन्यात एक लाखापेक्षाही जास्त प्रवाशांची ‘बेस्ट’ नोंदणी झाली आहे.

हेही वाचा – मालाडमधून दहशतवाद्याला अटक, महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई

- Advertisement -

अंधेरी (पूर्व व पश्चिम) विभागातील उदंड प्रतिसाद पाहता याच महिन्यात विलेपार्ले, जुहू, सांताक्रुझ, खार, वांद्रे, माहीम व दादर आदी ठिकाणीही ‘ई-बाईक’ सेवा सुरू करण्यात येणार आहे. सध्या एक हजार ‘ई-बाईक’ सेवा सुरू आहेत. जून २०२३ पर्यंत संपूर्ण मुंबईत पाच हजार ‘ई-बाईक’ सेवा सुरू करण्याचा बेस्ट उपक्रमाचा संकल्प आहे.

मुंबईसारख्या धावत्या शहरात लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. शहरात रस्त्यालगत व पदपथावर झालेले अतिक्रमण पाहता मोठे रस्ते दिवसेंदिवस अरुंद होत चालले आहेत. त्यातच वाहन पार्किंगची नीटपणे व्यवस्था नाही. त्यामुळे वाहनधारक, चालक हे रस्त्यालगतच वाहने पार्क करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूक कोंडी ठिकठिकाणी होताना दिसते. परिणामी चाकरमान्यांना नोकरीला अथवा इच्छित स्थळी ये – जा करण्यात भरपूर वेळ खर्च पडतो. इंधन वाया जाते. वाहतूक कोंडी झाल्याने प्रदूषणाला हातभार लागतो. यावर बहुउपयोगी तोडगा बेस्ट उपक्रमाने शोधून काढला आहे. वाहतूक कोंडीतून सुटका, वेळेची बचत, सुरक्षित व प्रदूषण मुक्तीसाठी बेस्ट उपक्रमाने ‘वोगो कंपनी’ सोबत एक सामंजस्य करार करून त्यांच्याकडून ‘ई-बाईक’ सेवा सुरू केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईतील आपत्कालीन परिस्थितीबाबत सक्रिय असणं गरजेचं, अतिरिक्त आयुक्तांकडून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

प्रारंभी प्रयोगिक तत्वांवर २२ जूनपासून अंधेरी पूर्व व पश्चिम येथे ‘ ई- बाईक’ सेवा सुरू करण्यात आली होती. त्याला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे बेस्टने १५ ऑक्टोबरपर्यंत १८० बस थांब्यावर एक हजार ‘ई- बाईक’ सेवा सुरू केल्या आहेत. आता पुढील जून २०२३ पर्यंत मुंबईत पाच हजार ‘ई-बाईक’ सेवा सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

- Advertisment -