घरताज्या घडामोडीE-Pass : स्थानिक पोलिस स्टेशनमध्येही मिळणार E-Pass ? नोंदणीच्या ६ सोप्या स्टेप्स

E-Pass : स्थानिक पोलिस स्टेशनमध्येही मिळणार E-Pass ? नोंदणीच्या ६ सोप्या स्टेप्स

Subscribe

स्थानिक पोलिस स्टेशनमध्येही मिळणार E-Pass

महाराष्ट्रात कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता अधिक कडक नियमावली करण्याचा इशारा राज्य सरकारकडून पुन्हा एकदा देण्यात आला आहे ब्रेक द चेन नियमावलीत आता E-pass सिस्टिमचीही भर पडली आहे. संपुर्ण महाराष्ट्रात अत्यावश्यक स्वरूपाच्या प्रवासासाठी यापुढे E-pass घेऊनच प्रवास करावा लागणार आहे. आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवासासाठी यापुढे अतिशय आपत्काली परिस्थितीतच हे E-pass मंजुर करण्यात येतील अशी माहिती पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली प्रवासासाठीची नवीन नियमावली ही २२ एप्रिलपासूनच अंमलात आली आहे. आज शुक्रवारपासून E-pass ची सुविधा राज्यात लागू झाली आहे, असे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी स्पष्ट केले. खूपच अत्यावश्यक अशा परिस्थितीसाठीच E-pass मंजुर करण्यात येईल असेही ते म्हणाले.

E-pass साठी कशी नोंदणी कराल ?

१. तुम्हाला https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटवर E-pass काढता येईल
2. या लिंकवर तुम्हाला दोन पर्याय दिसतील. E-pass नोंदणीसाठी Apply for New Pass क्लिक करा.
३. महाराष्ट्राबाहेर पासची भेट देण्याची गज आहे का ? या पर्यायाची निवड करा.
४. तुम्ही महाराष्ट्राबाहेर प्रवास करणार असाल तर, होय पर्याय निवडावा लागेल, त्यामध्ये प्रवासी संख्या नमुद करा
५. महाराष्ट्राच्या बाहेर प्रवास करणार नसाल तर, नाही पर्याय क्लिक करा, सबमिट करा.
६. जिल्हा किंवा पोलिस आयुक्तालय, प्रवासाचा कालावधी, मोबाईल नंबर, प्रवासाचे कारण, प्रवासाचा उद्देश, वाहनाचा प्रकार, वाहन क्रमांक, सध्याचा पत्ता, ईमेल, प्रवासाचे आरंभाचे ठिकाण, प्रवासाचे अंतिम ठिकाण, सहप्रवासी संख्या, प्रवासाचा अंतिम ठिकाणचा पत्ता, तुम्ही कंटेनमेन्ट झोनमध्ये आहात का?, परतीचा प्रवास याच मार्गाने करणार का ? यासारख्या गोष्टी तुम्हाला वेबपेजवर सबमिट कराव्या लागतील.

- Advertisement -

कोणती कागदपत्रे आवश्यक ?

१. वैद्यकीय संबंधित कागदपत्र तसेच आधार, ओळखपत्र
२. डॉक्टरांचे प्रमाणपत्र
३. फोटो (२०० kb) पेक्षा कमी
४. अपलोड करणाऱ्या प्रत्येक फाईलची साईझ १ MB पेक्षा जास्त नसावी.

ऑनलाईन एक्सेस नसणाऱ्यांना E-Pass कसा मिळेल ?

ज्यांना ऑनलाईन E-Pass ची सुविधा उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये हा E-Pass घेण्याची सुविधा आहे. पोलिस स्टेशनमध्ये अशा गरजू नागरिकांसाठी पासची सुविधा देण्यासाठी मदत करण्यात येईल. पोलिस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांकडून या व्यक्तींना E-Pass ऑनलाईन पद्धतीने काढून देण्यात येईल, असे पांडे यांनी सांगितले. ज्यांना खूपच अत्यावश्यक अशा कारणासाठी प्रवास करायचा आहे, अशाच नागरिकांसाठी ही प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे.

- Advertisement -

कडक निर्बंधांमुळे अनेकांकडून प्रवासाची विनंती करण्यात आली आहे. त्यामुळेच मुंबई पोलिसांनी E-Pass सुविधेअंतर्गत हा पर्याय देऊ केला आहे. याआधी मुंबई पोलिसांकडून ई पासची सुविधा देण्यात येणार नाही असे सांगण्यात आले होते. पण वाढत्या मागणीमुळेच पोलिस विभागाला ही सुविधा सुरू करावी लागली आहे. मुंबई पोलिसांनी मुंबईतील वाहनांसाठी अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रवास करणाऱ्यांसाठी वाहनांना वेगवेगळ्या रंगाचे स्टिकर्स लावण्याची नवीन पद्धतही सुरू केली आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -