घरCORONA UPDATECovid-19 वर घरबसल्या वैद्यकीय सल्ला शोधताय? ई-संजीवनी एप आहे की मदतीला

Covid-19 वर घरबसल्या वैद्यकीय सल्ला शोधताय? ई-संजीवनी एप आहे की मदतीला

Subscribe

राज्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक कोरोना रुग्नांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, इंजेक्शनसारख्या अत्यावश्यक गोष्टी मिळवणे कठीण जात आहे. परंतु कोरोनाचे असेही अनेक रुग्ण आहेत ज्यांना सामान्य लक्षणे दिसतात किंवा लक्षण नसूनही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहे. अशा रुग्णांसाठी राज्य सरकारने ई संजीवनी अॅप तयार केला आहे. या अॅपच्या माध्यमातून रुग्णाला घर बसल्याच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ल्याने कोरोनावर उपचाप घेता येत आहेत. लॉकडाऊनदरम्यान सुरु झालेल्या ई- संजीवनी ऑनलाइन ओपीडीला रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दररोज किमान ३०० रुग्ण त्याद्वारे वैद्यकीय उपचार सल्ला घेत आहेत.

जे कोरोनाबाधित रुग्ण घरच्या घरी उपचार घेत आहेत किंवा विलगीकरणात असलेले रुग्ण या ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात. ई- संजीवनी मोफत सेवा देत आहे. या माध्यमातून सामान्य तसेच तज्ज्ञ ओपीडी सेवा सुरु करण्यात आली आहे. यात राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. ठरवून दिलेल्या दिवसात सर्व वैद्यकीय अधिकारी रुग्णांना त्यांच्या आजारावर ऑनलाईन सल्ला देतात.

- Advertisement -

दररोज सकाळी ९ ते दुपारी १.४५ आणि सायंकाळी ५ या वेळेत ही सेवा देण्यात येते. यात रुग्णांना व्हिडिओ कॉन्फरसिंग आणि चॅटचा वापर करुन घरबसल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी आजाराबाबत सल्ला घेता येतो. ई-संजीवनी ओपीडी रुग्णांना ऑनलाइन सल्ला दिल्यानंतर SMS द्वारे ई-प्रिस्क्रिप्शन रुग्णांना पाठवते, त्याद्वारे रुग्ण जवळच्या सरकारी रुग्णालयातून औषधे घेऊ येऊ शकतोय.

- Advertisement -

ई-संजीवनी ऑनलाईन ओपीडी सेवेचा वापर करण्याकरिता रुग्ण esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला भेट देऊन डॉक्टरांशी सवांद साधू शकतो किंवा गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन ‘esanjeevani OPD National Telconsultation Service’ हे अॅप्लिकेशन डाउनलोड करु शकता,

परंतु या अॅपमध्ये रुग्णांना सर्वप्रथम ऑनलाइन नोंदणी आणि इ टोकन जनरेट करावा लागतो. त्यानंतर ओटीपीचा वापर करुन मोबाईल नंबर टाकून अकाउंट वेरिफाय करुन घ्यावे लागते. यानंतर रुग्णांमसाठी असलेला फॉर्म भरून टोकनसाठी विनंती करावी लागते. या फॉर्ममध्ये आधीपासूनच आजारी असल्याच त्याची माहिती द्यावी लागते. व SMS द्वारे तुम्हाला ऑनलाईन पेशंट आयडी आणि ई-टोकन मिळते.

यानंतर तुम्हाला स्क्रिनवर लॉग इन करण्यासाठी SMS येण्याची वाट पाहावी लागेल व त्यानंतर तुम्ही पेशंट आयडीसह लॉग इन करु शकता. एवढे झाल्यानंतर तिसरी पायरी म्हणजे प्रतिक्षालय. यामध्ये तुम्ही प्रतीक्षालयात प्रवेश करता, प्रवेश केल्यानंतर थोड्यावेळात ‘CALL NOW’हे बटण अॅटिव्हेट होईल यानंतर व्हिडिओ कॉलला सुरुवात होईल.

यात तज्ज्ञ डॉक्टर आपल्या स्क्रिन समोर येतील त्यावेळी तुम्ही त्यांचाकडे सल्ला मागू शकता. योग्य समाधान झाल्यानंतर डॉक्टरांकडून ई-औषधपत्र किंवा ई-प्रिस्क्रिप्शन मिळेल.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -