घरCORONA UPDATECoronavirus : लॉकडाऊनच्या काळात या चार क्षेत्रातून घरबसल्या कमाई करा!

Coronavirus : लॉकडाऊनच्या काळात या चार क्षेत्रातून घरबसल्या कमाई करा!

Subscribe

देशभरातील टाळेबंदीमुळे सर्वजण घरामध्ये कैद झाले आहेत. लोकांकडे काम आहे, परंतु ते काम करू शकत नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे. 

देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे नोकरी धंदे ठप्प झाले आहेत, अशावेळी काही कंपन्या कामगारांना नोकरीवरून काढून टाकत आहे. देशभरातील टाळेबंदीमुळे सर्वजण घरामध्ये कैद झाले आहेत. लोकांकडे काम आहे, परंतु ते काम करू शकत नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे.  तसेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकऱ्या सहजासहजी मिळत नाही. अशावेळी तुम्ही नव्या जॉबच्या प्रतीक्षेत कॉर्पोरेट ऑफिसमध्ये चकरा मारून वैतागले असाल. याशिवाय आपल्या घर खर्चाच्या टेन्शनमुळे नोकरी सोडण्याची हिम्मत करत नाही. तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. घर बसल्या काम करून दोन पैसे कमविण्यासाठी चार कामांची माहिती तुम्हाला देत आहोत.

Social Media Marketing Consultant: सोशल मीडिया आजच्या घडीला पैसे कमविण्याचे मोठे साधन निर्माण झाले आहे. कंपन्यांनाही याचे महत्त्व समजले आहे. कंपन्यांना आपल्या प्रॉडक्ट्सचे प्रमोशन करण्यासाठी सोशल मीडिया मार्केटिंग कन्सल्टंटची गरज असते. मार्केटमध्ये अशा लोकांची मोठी मागणी असते. जर तुम्ही हे काम करू शकता, तर हे फिल्ड आपल्यासाठी योग्य आहे.

- Advertisement -

IT Specialist : जवळपास प्रत्येक कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आयटी स्पेशालिस्टची मागणी असते. थोडी फार ट्रेनिंग घेऊन काम सुरू करू शकता. या कामात गुगलचा नऊ महिन्याचा आयटी सपोर्ट प्रोफेशनल सर्टिफिकेट महत्त्वाचे असते. यामध्ये लोक पार्ट टाइम करून चांगली कमाई करू शकतात.

Instagram Marketing : हा कमाई करण्याचा चांगला आणि सोपा मार्ग आहे. तुम्ही फोटो आणि व्हिडीओ या क्षेत्रात हुशार असाल तर अनेक कंपन्यांचे इंस्टाग्राम फीड फुल करण्याची ऑफर मिळू शकते. यामध्ये बेसिक ट्रेनिंगची आवश्यकता असते. यात ऑनलाइन कोर्स ही करू शकता. कोर्स केल्यानंतर घर बसल्या कमाई करू शकता.

- Advertisement -

Graphic Designer : लिंक-इनवर या क्षेत्रातील लोकांची वैकेंसी निघत असते. फुल्ल टाइम आणि फ्रिलासिंग कामासाठी या लोकांची मागणी जास्त असते. असे मानले जाते की, सोशल मीडियावर आपले म्हणणे सरळ आणि प्रभावीपणे मांडण्यासाठी ग्राफिक हे महत्त्वाचे असते. या क्षेत्रात रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -