घरदेश-विदेशLive Update : सॅम पित्रोदा यांच्याकडून अनिवासी भारतीय काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा

Live Update : सॅम पित्रोदा यांच्याकडून अनिवासी भारतीय काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा

Subscribe

सॅम पित्रोदा यांच्याकडून अनिवासी भारतीय काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा

काँग्रेसकडून सॅम पित्रोदांचा राजीनामा मान्य

- Advertisement -

काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांची माहिती

8/5/2024 19:22:33

- Advertisement -

पुण्यातील न्याती एक्सप्रेस सोसायटीमध्ये आग

आगीमुळे परिसरात धुराचे लोट

अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल

8/5/2024 18:17:56


नाशिकमध्ये महायुतीच्या बैठकीला सुरुवात

बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित, पण छगन भुजबळ अनुपस्थित

महायुतीच्या घटक पक्षातील सर्व नेत्यांची बैठकीला हजेरी

8/5/2024 16:52:11


मोस्ट वॉण्टेड अतिरेकी बासितची हत्या; NIA ने 10 लाखांचं ठेवलं होत बक्षीस

काश्मिरी पंडितांच्या हत्यांचा मास्टरमाइंड अतिरेकी असलेल्या बासितला सुरक्षा जवानांनी कंठस्नान घातलंय. कुलगामच्या रेडवानी पयीन परिसरात 12 तास चकमक सुरू होती. त्याच्यावर NIA ने 10 लाखांचं बक्षीस ठेवलं होतं.

8/5/2024 12:55:51


सहकार खात्याचा सदावर्तेंना दणका; एसटी बँकेतील संचालक पद रद्द

सदावर्ते दाम्पत्याचं एसटी बँकेतील संचालक पद रद्द करण्यात आलं आहे. सहकार खात्याने सदावर्तें दाम्पत्याला हा दणका दिला आहे.

8/5/2024 11:9:5


हेमंत गोडसेंनी मंत्री भुजबळांची घेतली भेट

भुजबळांच्या नाशिक कार्यालयात गोडसेंनी भेट घेतली. तसंच, त्यांना प्रचारात सहभागी होण्यासाठी विनंतीही केली आहे.

8/5/2024 10:50:53


बारामतीत पैसे वाटप, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तक्रार दाखल

बारामतीमध्ये मतदानाच्या दिवशी अनेक गैरप्रकार घडल्याचा आरोप करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने ट्विटरच्या माध्यमातून विरोधी पक्षावर टीका केली आहे. “बारामती लोकसभा मतदारसंघात पार पडलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘बारामती’ ने संपूर्ण महाराष्ट्रासाठी केलेला हा पत्रप्रपंच!” या मथळ्याखाली पत्र लिहित टीका करण्यात आली आहे.

8/5/2024 10:49:26


कोकण रेल्वेने गणेशोत्सवाच्या सिझनचं बुकिंग सुरु केलं अन् अवघ्या 63 सेकंदात तिकीटं संपली

कोकण रेल्वेने गणेशोत्सवाच्या सिझनचं बुकिंग सुरू केलं आणि ते अवघ्या 63 सेंकदात तिकीटं संपली आहेत. सर्व गाड्या फक्त 1 मिनिटांत आरक्षित झाल्या. यामुळे आता प्रवाशांनी तिकीट आरक्षण प्रक्रियेत गैरप्रकाराचा आरोप केला आहे.

8/5/2024 10:0:3


एअर इंडियाचे कर्मचारी सामुहिक रजेवर; 70 उड्डाणं रद्द

आजारी असल्याचं कारण देत, एअर इंडियाचे कर्मचारी सामुहिक रजेवर गेले आहेत

त्यामुळे आता 70 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.

8/5/2024 8:37:3


पुण्यात महायुतीची बैठक सुरू

8/5/2024 7:45:45


अरुणाचल प्रदेशात भूंकपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

अरुणाचल प्रदेशातील लोअर सुबानसिरी येथे आज पहाटे 4.55 वाजता 3.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप झाला, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने जाहीर केली आहे.

8/5/2024 7:30:33


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -