कोल्हापुरात भूकंपाचे धक्के; 3.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

palestine earthquake shook by strong tremors 4 8 measuredintensity turkiye syria earthquake live

मागील काही दिवसांपासून देशातील विविध ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवत आहे. यात 25 ते 26 ऑगस्टदरम्यान रात्री जम्मू काश्मीरपासून ते महाराष्ट्रातील कोल्हापूरपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. कोल्हापूरात 25 ऑगस्टच्या मध्यरात्री 2.21 च्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 3.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप असल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपात कोणतीही जीवित अथवा मालमत्तेची हानी झालेली नाही. अशा माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीकडून देण्यात आली आहे. या भूकंपाची खोली जमिनीखाली 10 किमी होती अशी माहिती आहे.

मात्र कोल्हापूरात भूकंपनाचे केंद्र नेमकं कुठे आहे. याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मध्यरात्रीच्या सुमारास जाणवलेल्या या भूकंपात जीवितहानी झालेली नसली तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार महाराष्ट्रातील कोल्हापूरात रात्री 2.21 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिक्टर स्केलवर 3.9 इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचे केंद्र 10 किलोमीटर खोल होता. कर्नाटकातील विजापूरजवळ या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे, अल्लमट्टी धरणाच्या जवळ केंद्रबिंदू असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यापूर्वी दोन दिवस आधी नाशिकच्या दिंडोरीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. दिंडोरीतील काही गावांमध्ये भूकंपाचे हे धक्के जाणवले. मात्र ज्या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवत आहे त्याठिकाणच्या नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

दरम्यान कोल्हापूर पाठोपाठ जम्मू काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर येत आहे. जम्मू काश्मीरमधील कटरा येथून 62 किमी अंतरावर पहाटे 3.28 वाजता 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. या भूकंपाची खोली जमिनीखाली 5 किमी होती, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिली आहे. गेल्या तीन दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवण्याची ही सातवी वेळ आहे.

याशिवाय अफगाणिस्तानमधील काबूलमध्येही काल रात्री 2.55 वाजता 4.3 तीव्रकेचा भूकंप झाला. या भूकंपाची खोळी 80 किमी होती.


अनिल अंबानींना आयकर विभागाची नोटीस; 814 कोटींचा करचुकवेगिरी केल्याचा आरोप