घरमहाराष्ट्र"आधी जेवून घ्या, मग बोलतो"; पवारांचे कार्यकर्त्यांना फोनवरून आवाहन

“आधी जेवून घ्या, मग बोलतो”; पवारांचे कार्यकर्त्यांना फोनवरून आवाहन

Subscribe

कार्यक्रमाला आलेल्या कार्यकर्त्यांनी व्हाय. बी. चव्हाण सेंटर बाहेर बसून आंदोलनाला सुरूवात केली. पण यावेळी कार्यकर्त्यांनी इथून उठावे, अशी विनंती करण्यासाठी अजित पवार आणि सुप्रिया सुळे आले होते. पण तरी देखील कार्यकर्ते त्यांचे ऐकून घेण्यास तयार नसल्याते पाहायला मिळाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज मंगळवारी (ता. 5 मे) ‘माझे सांगाती… राजकीय आत्मकथा’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. पण यावेळी शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर कार्यक्रमस्थळी कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार यांनी एकच गोंधळ घालत पवार यांना निर्णय मागे घेण्याची मागणी केली. परंतु शरद पवार यांनी घेतलेला निर्णय मागे घेण्यात यावा, यासाठी राज्यभरात कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. या कार्यक्रमाला आलेल्या कार्यकर्त्यांनी व्हाय. बी. चव्हाण सेंटर बाहेर बसून आंदोलनाला सुरूवात केली. पण यावेळी कार्यकर्त्यांनी इथून उठावे, अशी विनंती करण्यासाठी अजित पवार आणि सुप्रिया सुळे आले होते. पण तरी देखील कार्यकर्ते त्यांचे ऐकून घेण्यास तयार नसल्याते पाहायला मिळाले.

शरद पवारांचे कार्यकर्त्यांना फोनवरून आवाहन
व्हाय. बी. चव्हाण सेंटर बाहेर बसलेल्या कार्यकर्त्यांशी शरद पवार यांनी फोनवरून संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना फोन लावला आणि कार्यकर्त्यांशी बोलण्यास सांगितले. “तुम्ही आता सगळे तिथे बसलेले आहात. पण आधी तुम्ही जाऊन जेवून घ्या, मग मी बोलतो,” असे आवाहन शरद पवार यांच्याकडून कार्यकर्त्यांना करण्यात आले.

- Advertisement -

एकीकडे शरद पवार यांनी निवृ्त्तीची घोषणा केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भूकंप झाला. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्याचे काम पक्षातील सर्वच नेते करत असताना अजित पवार यांनी त्यांच्या निर्णयाला पाठिंबा देत म्हणाले की, “सगळ्यांच्या भावना साहेबांनी ऐकल्या. तुम्ही एक गैरसमज करून घेताय, पवार साहेब अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षाचा भाग नाही असे नाही. आज काँग्रेसमध्ये अध्यक्ष खर्गे असले तरी ते पक्ष सोनिया गांधी यांच्याकडे पाहून सुरू आहे. पवार साहेबांच्या वयाचा विचार करता साहेबांशी आणि सगळ्यांशी चर्चा करून एका नवीन नेतृत्वाकडे आपण जबाबदारी देऊ पाहतोय. ते नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल,” असे अजित पवार यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.


हेही वाचा – शरद पवारांच्या निवृत्तीने ‘मविआ’वर काय परिणाम होणार? अशोक चव्हाण म्हणाले…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -