Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र ऐश्वर्या रायसारखे मासे खा, कोणालाही पटवाल; गावित यांच्या वक्तव्याने नव्या वादाला फुटणार तोंड?

ऐश्वर्या रायसारखे मासे खा, कोणालाही पटवाल; गावित यांच्या वक्तव्याने नव्या वादाला फुटणार तोंड?

Subscribe

धुळे : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) सत्तेत असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारमधील (Shinde-Fadnavis government) आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित (Tribal Development Minister Vijaykumar Gavit) यांनी एका जाहीर भाषणात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा (Aishwarya Rai) उल्लेख करताना ती दररोज मासे खायची, त्यामुळे तिचे डोळे आणि त्वचा सुंदर आहे. तुम्ही सुद्धा मासे खा म्हणजे तुमचेही डोळे सुंदर होतील, असं विधान विजयकुमार गावित यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. (Eat Fish Like Aishwarya Rai Convince Anyone Will Gavits statement lead to a new controversy)

हेही वाचा – State Guest देवेंद्र फडणवीस यांचे जपानमध्ये मराठमोळ्या पद्धतीने स्वागत

- Advertisement -

विजयकुमार गावित हे नंदुरबारमधील भाजपा नेते असून सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्रिपदाची धुरा सांभाळत आहेत. त्यांनी धुळ्यात आयोजित मासेमारी करणाऱ्यांना साधनसामुग्रीच्या वाटपाचा कार्यक्रमात विजयकुमार गावित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थिताना मासे खाण्याचे फायदे सांगताना बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, ऐश्वर्या राय रोड मासे खाते म्हणून तिचे डोळे इतके सुंदर आहेत. तुम्हालाही सुंदर डोळे हवे असतील आणि त्वचाही उजळायची असेल तर, रोज मासे खा, असा सल्लाही त्यांनी दिला.

वादग्रस्त वक्तव्य

विजयकुमार गावित म्हणाले की, मासे खाण्याचे दोन फायदे आहेत. मासे खाल्ल्यावर माणूस म्हणजे बाईमाणूस चिकणे दिसायला लागतात आणि डोळे तरतरीत दिसतात. कुणीही बघितली तरी पटवूनच घेणार. तुम्ही ऐश्वर्या राय बघितली ना, ती बेंगळुरला समुद्रकिनारी राहायची. त्यामुळे ती दररोज मासे खायची म्हणून तिचे डोळे सुंदर आहेत. माशांमध्ये तेल असतं. माशांच्या तेलामुळे डोळ्यांना आणि त्वचेला चांगला फायदा होतो. गावित यांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ते कुजबूज सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. अनेकांनी उभे राहून गावित यांचे विधान फारसे पटलं नसल्याचं दर्शवलं.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai-Pune Expressway : कंटेनरचा भीषण अपघात; दोनजण जागीच ठार, पाच जखमी

विजयकुमार गाविताची वादग्रस्त कारकिर्द

राष्ट्रवादी काँग्रेसमधून 2019 मध्ये भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर विजयकुमार गावित यांनी पक्षाच्या तिकिटावर नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. मात्र वादग्रस्त विधानाप्रकरणी ते अनेकदा अडचणीत सापडले आहेत. आदिवासी कल्याण विभागांतर्गत मंडळाचे पदसिद्ध प्रमुख असताना टेंडरशिवाय कोट्यवधी रुपयांची कामे वाटप केल्याचा आरोप त्यांच्यावर सिद्ध झाला होता. 2017 मध्ये याचा अहवाल सरकारकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. तसेच पत्रकाराला धमकावल्याप्रकरणीही ते अडचणीत सापडले होते. गावित यांना अनेकदा भ्रष्टाचार प्रकरणावरून लक्ष्य करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एम.जी.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने विजयकुमार गावित यांना आदिवासी कल्याण विभागातील भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरवले होते. असे असतानाही त्यांना शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळाले.

- Advertisment -