घरताज्या घडामोडीED ची राहुल आणि सोनिया गांधींवर कारवाई; मुंबईसह दिल्ली, लखनऊची 751 कोटींची...

ED ची राहुल आणि सोनिया गांधींवर कारवाई; मुंबईसह दिल्ली, लखनऊची 751 कोटींची मालमत्ता जप्त

Subscribe

नवी दिल्ली/मुंबई – नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या संसदीय नेत्या सोनिया गांधी यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. ईडीने असोसिएटेड जर्नल्स लि. (ALJ) आणि यंग इंडिया (YI) या दोन संस्थांच्या 751 कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. एएलजे संस्थेची एकूण मालमत्ता 661.69 कोटी रुपये आहे. ईडीने या संस्थेच्या मुंबई, दिल्ली आणि लखनऊ येथील मालमत्ता जप्त केल्या आहेत. यंग इंडिया या संस्थेच्या 90.21 कोटी रुपयांवरही ईडीने जप्तीची कारवाई केली आहे.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरु आहेत. मध्यप्रदेशमध्ये मतदान झाले आहे तर राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये प्रचाराने वेग घेतला आहे. अशा काळात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांवर झालेल्या या कारवाईने सर्व पक्षीय नेत्यांनी बदल्याच्या भावनातून कारवाई झाल्याचे व्यक्त केले आहे. काँग्रेसने ईडीच्या या कारवाईवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, असोसिएटेड जर्नल्स लि. आणि यंग इंडियावर झालेली कारवाई ही भाजपला पाच राज्यांमध्ये पराभव दिसत असल्यामुळे निराशेतून झाली आहे. भाजपची हताशा आणि निराशा यातून स्पष्ट होत असल्याचे सिंघवी म्हणाले.

- Advertisement -


मध्यप्रदेशमध्ये मागीलवेळी काँग्रेसचे सरकार होते. मात्र कोरोनाकाळात ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पारडे बदलेल आणि ते भाजपसोबत गेले. त्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमुळे भाजपचे शिवराजसिंह सत्तेत आले आणि सिंधिया यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले. आता येथे झालेल्या निवडणुकीत जनतेचा कौल कोणाला हे 3 डिसेंबर रोजी कळणार आहे. तर, राजस्थानमध्ये अशोक गहलोत यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे सरकार आहे. गहलोत सरकारच्या योजना आणि काँग्रेसच्या घोषणा पत्रातील आश्वसनांमुळे भाजपला राजस्थानातही परिस्थिती अवघड असल्याचे काँग्रेस नेत्यांचे मत आहे. त्यामुळेच राहुल आणि सोनिया गांधींना त्रास देण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -