शिवसेना नेते अर्जुन खोतकरांवर ईडीची कारवाई, ७८ कोटींच्या संपत्तीवर टाच

Arjun Khotkar

बंडखोर आमदारांमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलेले असताना शिवसेनेचा एक नेता ईडीच्या रडारवर आला आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या जालना येथील साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. या कारवाईत साखर कारखान्याची जमीन जप्त करण्यात आली आहे. अवैध लिलाव केल्याप्रकरणी ही कारवाई झाल्याचं समोर येत आहे. (ED Action agaisnt Shivsena leader Arjun Khotkar)

हेही वाचा – माझं मुख्यमंत्रिपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेद्वारे सहकारी साखर कारखान्यांच्या बेकायदेशीर लिलावाशी संबंधित प्रकरणात ईडीने ने PMLA अंतर्गत जालन्यातील सावरगाव येथील सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवर इडीने जप्ती आणली आहे. या कारवाईत ईडीने इमारत आणि संरचना, प्लांट आणि यंत्रसामग्रीवर टाच आणल्याची माहिती ईडीकडून मिळाली आहे. जप्त केलेली ही मालमत्ता ७८.३८ कोटींची असल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने दिली आहे.