घरताज्या घडामोडीNawab Malik terror funding angle : 'टेरर फंडिंग एंगल' NIA ला आढळला,...

Nawab Malik terror funding angle : ‘टेरर फंडिंग एंगल’ NIA ला आढळला, म्हणूनच नवाब मलिकांवर ईडीची कारवाई – देवेंद्र फडणवीस

Subscribe

मुंबईतील कुर्ला एलबीएस मार्गावर गोवावाला कंपाऊंड येथील हजारो कोटींची जमीन नवाब मलिक यांनी खरेदी कशा पद्धतीने केली याचा सगळा उलगडा ईडीने आज सत्र न्यायालयात केला आहे. ज्यांची जमीन होती त्यांना व्यवहारात एकही पैसा मिळाला नसल्याचे समोर आले. टेरर फंडिंगच्या लिंक या राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणेला आढळल्या आहेत. त्यामुळेच या प्रकरणात हसीना पारकरच्या माध्यमातून दाऊदला पैसे देण्यात आले. या व्यवहारानंतर मुंबईत तीनवेळा बॉम्बस्फोट झाले. एक मंत्र्यांने देशाच्या दुश्मनासोबत व्यवहार करण्याचे कारण असा सवाल राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ईडीने नवाब मलिक यांनी ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

नवाब मलिक यांच्यावर दहशतवादी कृत्याशी संबंधित कारवाई झाली आहे, म्हणूनच न्यायालयाने ईडीची कोठडी सुनावली असल्याचे फडणवीस म्हणाले. टेरर फंडिंगचे पुरावे ईडीने कोर्टाला दिले आहेत. गेल्या काही दिवसात ईडीने झालेल्या छापेमारीमध्ये टेरर फंडिंगच्या लिंक आढळल्या आहेत. ईडीला या व्यवहारात टेरर एंगल आढळल्यानेच शाहवली खान याचीही या जमीन व्यवहारातील चौकशी ईडमार्फत झाली आहे. १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात शाहवली खान हा जन्मठेपेची शिक्षा भोगत असून कारागृहात जाऊन त्याची चौकशी ईडीने केल्याचेही फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

पॉवर ऑफ अॅटर्नी बदलून सगळा व्यवहार २५ लाख दिल्याचे दाखवले जातय. त्यातील एकही पैसा नाही मूळ मालकाला मिळाला नाही. ज्याठिकाणी सौदे झाले, हसीना पारकरने जाऊन व्यवहार केल्याचा लोकांनी जबाब दिला आहे. या व्यवहारात ५५ लाख रूपयांचा व्यवहार झाल्याचे पुरावे ईडीला मिळाले आहेत. एकुण व्यवहारात कशा प्रकारे ही सगळी जमीन अंडरवर्ल्डच्या मदतीने नवाब मलिकांना मिळाली आणि हे सगळे पैसे अंडरवर्ल्डला गेले याचे टेरर कनेक्शन ईडीला सापडल्यानेच ईडीमार्फत कारवाई झाली आहे.

हसीन पारकर आणि नवाब मलिक यांच्या झालेल्या सगळ्या व्यवहारातील काळा पैसा दहशतवादी कृत्यांसाठी करण्यात आला. दाऊदशी संबंधित व्यक्तीला वाचवण्यासाठी नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही तर देशात एक वेगळा संदेश जाईल. महाविकास आघाडी सरकार दाऊदशी संबंधित व्यक्तीच्या बचावासाठी उभे राहिले असा संदेश जाण्याची भीती असल्याचेही फडणवीस म्हणाले. त्यामुळेच देशाच्या दुश्मनाशी संबंधित व्यवहार करणाऱ्यांच्या मुद्द्यावर कोणतेही राजकारण करू नये.

- Advertisement -

त्यामुळे प्रश्न इतकाच उपस्थित होतो की, मंत्रीपदावर राहिलेल्या व्यक्तीने मुंबई बॉम्बस्फोटाच्या जमीन विकत घेण्याचे कारण काय ? हसीना पारकरशी व्यवहार करण्याचे कारण काय ? या व्यवहारानंतर देशात ३ वेळा दहशतवादी हल्ला. एक मंत्री म्हणून अशा देशाच्या शत्रूंना पैसा देणार असू तर हे कृत्य निंदनीय आहे. आज सगळी सत्य ईडीने मांडत नियमानुसार केलेली कारवाई आहे.

तर देशात चुकीचा पायंडा पडेल 

आम्हाला राजीनामा मागायची वेळच यायला नको, मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अन्यथा मंत्र्यांचा चेहरा भाजप बेनकाब करेल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. नवाब मलिक यांनी राजीनामा दिला नाही तर अतिशय चुकीचा पायंडा पाडला जातोय असा संदेश जाईल. नवाब मलिक यांना राजकीय गुन्ह्यात अटक झालेली नाही. त्यामुळे राजीनामा न दिल्यास एक संविधानिक परिस्थिती तयार होते आहे. त्यामुळे देशामध्ये चुकीचा संदेश जाईल पण राजकारणाचा स्तर पडेल. दाऊदसोबतच्या व्यक्तीला वाचवणाऱ्यांसाठी अख्ख सरकार उभ राहिले असा संदेश जाण्याची भीती असल्याचेही फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र सरकारच्या खोट्या साक्षीदारांची पोलखोल करणार

महाराष्ट्र सरकार कशा पद्धतीने खोटे साक्षीदार उभे करते याची लवकरच पोलखोल लवकरच करणार आहे. सरकार खोटे साक्षीदार तयार करते आणि लोकांना, नेत्यांना फसवण्याचे प्रयत्न करतेय याचा खुलासा करणार असल्याचेही फडणवीसांनी सांगितले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -