घरमहाराष्ट्रदापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणाच्या आरोपपत्रात अनिल परबांचं नावच नाही? सोमय्यांना धक्का!

दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणाच्या आरोपपत्रात अनिल परबांचं नावच नाही? सोमय्यांना धक्का!

Subscribe

दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात नुकतेच आरोपपत्र सादर केले आहे. परंतु या आरोपपत्रात ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचा उल्लेख नाही.

Anil Parab Dapoli Sai Resort: दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात नुकतेच आरोपपत्र सादर केले आहे. परंतु या आरोपपत्रात ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचा उल्लेख नाही. ईडीने आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप केला होता. पण आता मात्र परबांचं नाव आरोपपत्रातून वगळण्यात आल्यानं चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांना हा धक्का असल्याचं बोललं जात आहे. ( ED Anil Parab is not named in the charge sheet of Sai Resort case in Dapoli Shocked to kirit Somaiya )

पुरवणी आरोपत्र दाखल होऊ शकतं

सक्तवसुली संचालनालयाने नुकतेच दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. यात उद्योजक सदानंद कदम, दापोलीचे उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे आणि इतर चार जणांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, आरोपपत्रात माजी मंत्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू अनिल परब यांचा उल्लेख नाही. अनिल परब यांनी बेकायदेशीररित्या साई रिसॉर्टचं बांधकाम केल्याचा आरोप ईडीने केला होता. परंतु आता सादर केलेल्या आरोपपत्रात मात्र अनिल परब यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. तसचं, या प्रकरणात आमचा तपास सुरु असून, यात ईडी पुरवणी आरोपपत्र दाखल करु शकते, असं सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

CRZ च्या कायद्याचे उल्लंघन करुन साई रिसॉर्ट बांधण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. केंद्रीय तपास यंत्रणेने याप्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखीलल शिवसेना गटाचे ज्येष्ठ नेते अनिल परब यांची चौकशी केली होती. पर्यावरण कायद्याच्या कथित उल्लंघनासाठी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने दाखल केलेल्या तक्रारीमुळे मनी लाँड्रिंगचे प्रकरण समोर आले आहे.

( हेही वाचा: DCM फडणवीसांच्या टीकेला शरद पवारांनी एका वाक्यात दिले प्रत्युत्तर, म्हणाले… )

- Advertisement -

त्यानंतर जानेवारीमध्ये ईडीने परब आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंग चौकशीचा एक भाग म्हणून दापोली येथील साई रिसॉर्ट जप्त केले होते ज्यांची किंमत 10 कोटींहून अधिक आहे. परब यांनी कदम यांच्यासोबत मिळून स्थानिक उपविभागीय कार्यालयाकडूनही केवळ कृषी जमिनीचे आकृषित वापरासाठी रुपांतरित करण्यासाठी बेकायदेशीर परवानगी घेतली आणि सीआरझेडचे उल्लंघन करुन रिसॉर्ट बांधले, असे ईडीने म्हटले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -