घरताज्या घडामोडीसंजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांना ईडीकडून अटक, १ हजार ३४ कोटीं जमीन...

संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांना ईडीकडून अटक, १ हजार ३४ कोटीं जमीन घोटाळ्याचा आरोप

Subscribe

ईडीकडून या प्रकरणात मंगळवारी अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. यानंतर प्रवीण राऊत यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. प्रवीण राऊत यांनी चौकशीला सहकार्य केलं नसल्याने ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली आहे.

ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊतांना अटक केली आहे. एचडीआयएल घोटाळ्या प्रकरणी प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली आहे. १ हजार ३४ कोटींचा पत्राचाळ घोटाळ्यामध्ये ईडीकडून चौकशी सुरु होती. या प्रकरणात अनेकांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. प्रवीण राऊत यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळाल्यामुळे ईडीने त्यांना अटक केली आहे. दरम्यान ईडीने कोर्टासमोर बाजू मांडल्यावर कोणते पुरावे आणि माहितीच्या आधारे प्रवीण राऊत यांना अटक केली याबाबत माहिती मिळू शकते.

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत एचडीआयएलची सहाय्यक कंपनी गुरुआशिष कंट्रक्शनचे संचालक आहेत. प्रवीण राऊत यांच्यावर मनी लाँड्रिंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोरेगावमधील भूखंड विक्रीमध्ये एफएसआयमध्ये गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. ईडीकडून या प्रकरणात मंगळवारी अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. यानंतर प्रवीण राऊत यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. प्रवीण राऊत यांनी चौकशीला सहकार्य केलं नसल्याने ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली आहे.

- Advertisement -

संजय राऊतांच्या पत्नीच्या खात्यात ५० लाख ट्रान्सफर

प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. कारण प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या खात्यातून संजय राऊतांच्या पत्नीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केल्याच्या नोंदी होत्या. एकूण ५० लाख रुपये पाठवण्यात आले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांना याबाबतचे पुरावे सापडले होते. या प्रकरणात ईडीने अनेक लोकांची चौकशी केली होती.

- Advertisement -

हेही वाचा : Wine : सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीची परवानगी, शरद पवार म्हणतात विरोध फार चिंतेचा….

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -