महाराष्ट्रातील आणखी एक कंपनी ईडीच्या रडारवर; 46 कोटींची संपत्ती केली जप्त

ed attached 46 crore rs properties of Jogeshwari Breweries Pvt Ltd in osmanabad money laundering case

मनी लाँड्रिंग आणि करचुकवेगिरीच्या आरोपाखाली महाराष्ट्रातील विविध कंपन्यांवर ईडीचे धाडसत्र सुरु आहे. यातच उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा एमआयडीसीमध्ये एका मद्यनिर्मिती कंपनीवर ईडीने धाड टाकली आहे. ईडीने या कंपनीची जवळपास 46 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. जोगेश्वरी ब्रेवरीज प्रायव्हेड लिमिटेड असे या कंपनीचे नाव असून मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

हैदराबाद मुंबई महामार्गावर उमरगा एमआयडीसीमध्ये जोगेश्वरी ब्रेवरीज प्रायव्हेड लिमिटेड कंपनीची अल्कोहोल फॅक्टरी आहे. मात्र गेल्या चार वर्षांपासून कंपनी बंद आहे. उमेश शिंदे असे या कंपनी मालकाचे नाव असून ते कोल्हापूरचे रहिवासी आहेत. दरम्यान ईडीने उमेश धोंडीराम शिंदे आणि देवेंद्र उमेश शिंदे हे पिता पुत्र संचालक असलेल्या या जोगेश्वरी ब्रेवरीज प्रायव्हेड लिमिटेड कंपनीची मालमत्ता आणि मशिनरी जप्त केली आहे. यासंदर्भातील माहिती ईडीने ट्विट करून दिली आहे.

कंपनी कायद्याअंतर्गत जोगेश्वरी ब्रेवरीज प्रायव्हेड लिमिटेड कंपनी 5 मार्च 2009 रोजी नोंदणीकृत झाली आहे. नोंदणीवेळी कंपनीचे शेअर कॅपिलट 15 कोटींच्या घरात आहे. तर पेड कॅपिटल 2 कोटींवर आहे. य कंपनीची शेवटी वार्षिक सर्वसाधारण बैठक 30 नोव्हेंबर 2021 झाली होती, तर 31 मार्च 2021 पर्यंत कंपनीचे ऑडिट लेखा परीक्षण करण्यात आले. शिंदे रेसिडेन्सी, रुईकर कॉलनी, कोल्हापूर असा कंपनीचा नोंदणीकृत पत्ता असून 133602 हा नोंदणी क्रमांक आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स अंतर्गतही कंपनीची नोंदणी असून ही कंपनी अल्कोहोल निर्मिती करते.


दिल्ली- मुंबई प्रवास होणार सुसाट; गडकरींनी द्रुतगती महामार्ग, नवे रस्ते प्रकल्पांची दिली माहिती