घरताज्या घडामोडीनवाब मलिकांच्या अडचणीत वाढ; संपत्ती जप्त करण्यास ईडीला परवानगी

नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ; संपत्ती जप्त करण्यास ईडीला परवानगी

Subscribe

मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नवाब मलिक यांची संपत्ती जप्त करण्यास ईडीला (ED) परवानगी मिळाली आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नवाब मलिक यांची संपत्ती जप्त करण्यास ईडीला (ED) परवानगी मिळाली आहे. यामध्ये मुंबईतील गोवावाला कंपाऊंडमधील जमिनीचा एक भाग, कुर्ला पश्चिमेला तीन फ्लॅट, वांद्रे पश्चिम येथील दोन फ्लॅट आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 147 एकर शेतजमिनीचा समावेश आहे. (ed authority allows seizure of ncp leader nawab Malik assets Mumbai Osmanabad)

फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची दिवंगत बहीण हसना पारकरशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने कारवाई करत फेब्रुवारी महिन्यामध्ये नवाब मलिक यांना अटक केली होती. नवाब मलिक सध्या न्यायलयीन कोठडीत असून खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ईडीला संपत्ती जप्त करण्यास परवानगी मिळाल्याने मलिक कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

ईडीकडून जप्त करण्यात येणाऱ्या संपत्तीमध्ये मुंबईतील गोवावाला कंपाऊंडमधील जमिनीचा एक भाग, कुर्ला पश्चिमेला तीन फ्लॅट, वांद्रे पश्चिम येथील दोन फ्लॅट आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 147 एकर शेतजमिनीचा समावेश आहे. मालमत्ता ताब्यात घेण्याबाबत ईडीचे अधिकारी कायदेशीर सल्लामसलत करत आहेत. दरम्यान, नवाब मलिक यांना अटक केली होती त्यावेळी त्यांनी या संपत्तीमधील गोवावाला कंपाउंडमधील जमीन ही कायदेशीर मार्गाने खरेदी केली असल्याचा दावा त्यांनी केला.

काय आहे प्रकरण?

- Advertisement -
महाराष्ट्र सरकारमध्ये अल्पसंख्याक विकास मंत्री असलेल्या मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने अटक केली होती. या कारवाईने मोठी खळबळ उडाली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली होती. जमीन व्यवहाराशी संबंधित हे प्रकरण असून टेरर फंडिंग आणि मनी लाँडरिंगचा आरोप मलिक यांच्यावर करण्यात आला आहे. हे सर्व आरोप मलिक यांनी अमान्य केले असून ईडीची कारवाईच बेकायदेशील असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -