घरमहाराष्ट्रईडी, सीबीआयच्या लोकांना दुसरं काही काम आहे की नाही?, छगन भुजबळांचा सवाल

ईडी, सीबीआयच्या लोकांना दुसरं काही काम आहे की नाही?, छगन भुजबळांचा सवाल

Subscribe

भाजपचे पाठीराखे हे धुतल्यातांदळासारखे स्वच्छ आहेत का?, हर्षवर्धन पाटील म्हणतात भाजपमध्ये गेलो बरे झालं, इथे ईडी आणि सीबीआय आम्हाला उठवायला येत नाही. गप्प बसाल तर ठीक आहे, तोंड उघडाल तर कारवाई करू, असं चाललंय, असंही त्यांनी सांगितलंय.

नाशिकः ईडी आणि सीबीआयच्या लोकांना दुसरं काही काम आहे की नाही? देशातील सगळे अधिकारी इथेच आलेले आहेत काय, मला काही कळत नाही. भाजपचे पाठीराखे हे धुतल्यातांदळासारखे स्वच्छ आहेत का?, असं म्हणत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. छगन भुजबळ हे नाशिकमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी भाजप आणि केंद्रीय यंत्रणांना खडे बोल सुनावलेत.

सरकार कोणाचंही असलं तरी जनता ही सुप्रीम आहे. जनतेनं आवाज उठवल्यास काय होतं हे अनेक देशांनी पाहिलेलं आहे. विरोधी पक्षाच्या लोकांना तुम्ही किती छळणार आहात. नाना पटोले भाजपमध्ये खासदार असतानाही त्यांनी मोदींवर टीका केली होती. त्यानंतर नाना पटोलेंनी खासदारकी सोडून दिली, असंही छगन भुजबळांनी सांगितलंय. ते बोलले की ताबडतोब त्यांच्यावर ईडी. ईडी आणि सीबीआयच्या लोकांना दुसरं काही काम आहे की नाही? देशातील सगळे अधिकारी इथेच आलेले आहेत काय, मला काही कळत नाही. भाजपचे पाठीराखे हे धुतल्यातांदळासारखे स्वच्छ आहेत का?, हर्षवर्धन पाटील म्हणतात भाजपमध्ये गेलो बरे झालं, इथे ईडी आणि सीबीआय आम्हाला उठवायला येत नाही. गप्प बसाल तर ठीक आहे, तोंड उघडाल तर कारवाई करू, असं चाललंय, असंही त्यांनी सांगितलंय.

- Advertisement -

हेल्मेटसक्तीबाबत मी पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार- छगन भुजबळ

नाशिकमधील हेल्मेट सक्तीच्या मुद्द्यावरही छगन भुजबळांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. हेल्मेट सक्तीचा आदेश दिला होता, ते पाहण्यासाठी पेट्रोल पंप आणि काही ठिकाणी माणसं ठेवली होती. पुढचा किंवा मागचा दोघांपैकी कोणाच्याही डोक्यावर हेल्मेट नसेल आणि त्यांना अपघात झाला, तर पेट्रोल पंपवाल्यांनी त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केलं, असा गुन्हा दाखल करण्यात येईल, असं जे सगळे डिलर्स आले आहेत, त्यांचं म्हणणं आहे, असंही छगन भुजबळांनी सांगितलंय. त्याच्या निषेध म्हणून 2 तारखेला सर्व पेट्रोल पंप बंद करू. गुढीपाडवा शुभ दिवस असतो त्यादिवशी धंदा बंद करण्याच्या भानगडीत पडू नका. पेट्रोल पंप बंद करू नका. मी त्यांच्याशी बोलतो आणि तुमच्याशीही बोलतो. त्यांच्यातून आपण मार्ग काढू. तुम्ही पेट्रोल पंप बंद केल्यास तुमचा धंदा बंद होईल. मी पोलीस आयुक्तांशी यासंदर्भात चर्चा करणार असून, असा काही आदेश निघालाय का ते तपासणार आहे. तसा आदेश निघाला असल्यास मी माझं मत त्यांच्यासमोर मांडेन, असंही त्यांनी सांगितलंय.


हेही वाचाः एसटी कर्मचाऱ्यांना आज शेवटची संधी, अन्यथा उद्यापासून कठोर कारवाई होणार, अजित पवारांचा पुन्हा इशारा

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -