घरमहाराष्ट्रप्रताप सरनाईकांना ईडीचा दणका, 11.36 कोटींची संपत्ती जप्त

प्रताप सरनाईकांना ईडीचा दणका, 11.36 कोटींची संपत्ती जप्त

Subscribe

आस्था ग्रुपने एनएसईएलची 250 कोटी रुपयांची फसवणूक करून घोटाळा केला आणि सरनाईक यांच्या विहंग ग्रुप कंपनीने घोटाळ्यातील पैशांचा अपहार करण्यास मदत केल्याचाही आरोप केला जात आहे. आस्था ग्रुप व विहंग ग्रुपने एकत्र येऊन विहंग हाऊसिंग प्रोजेक्ट कंपनी सुरू करून योगेश देशमुख यांच्या मदतीने टिटवाळ्यामधील अनेक भूखंड विकत घेतले.

मुंबईः ईडीनं प्रताप सरनाईकांना मोठा दणका दिलाय. प्रताप सरनाईकांची 11.36 कोटी रुपयांची संपत्ती ईडीनं जप्त केलीय. NSEL प्रकरणात ईडीनं ही कारवाई केलीय. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी एनएसईएल घोटाळ्यात आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचा निकटवर्तीय योगेश देशमुखांनाही ईडीनं अटक केली होती.

आस्था ग्रुपने एनएसईएलच्या 250 कोटी रुपयांची फसवणूक करून घोटाळा केला आणि सरनाईक यांच्या विहंग ग्रुप कंपनीने घोटाळ्यातील पैशांचा अपहार करण्यास मदत केल्याचाही आरोप केला जात आहे. आस्था ग्रुप आणि विहंग ग्रुपने एकत्र येऊन विहंग हाऊसिंग प्रोजेक्ट कंपनी सुरू करून योगेश देशमुख यांच्या मदतीने टिटवाळ्यामधील अनेक भूखंड विकत घेतले.

- Advertisement -

देशमुख यांनी अनेक शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्या जमिनी विकत घेतल्या आणि त्यासाठी घोटाळ्यातील 22 कोटी रुपये वापरण्यात आल्याचे प्रथम समोर आले. मात्र, प्रत्यक्षात जमिनी विकत घेण्यासाठी केवळ एक कोटी रुपये वापरले आणि 11 कोटी रुपये सरनाईक यांच्या कंपनीत वळते करून देशमुख यांनी स्वत:कडे दहा कोटी रुपये ठेवले’, असा ईडीचा आरोप आहे.

काय आहे घोटाळा?

वर्ष 2013मध्ये समोर आलेल्या NSEL घोटाळ्यात नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेडद्वारे पेमेंट डिफॉल्टचे प्रकरण समोर आलेय. फॉरवर्ड मार्केट कमिशनने NSEL चे कॉन्ट्रॅक्ट लाँच करण्यापासून रोखलं आणि त्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. जुलै 2013 मध्ये स्पॉट एक्सचेंजला बंद करावे लागले. जुलै 2013 मध्ये स्पॉट एक्सचेंज बंद करावे लागले. ब्रोकर्सनी गुंतवणूकदारांना भरघोस परताव्याच्या आमिषाने एनएसईएलची उत्पादने विकली. स्पॉट एक्स्चेंजमध्ये मालाची वाढीव किंमत दाखवून गोदामातील बनावट पावत्या दाखविण्यात आल्या. 2013 मध्ये या डिफॉल्ट प्रकरणात 6445 गुंतवणूकदारांचे सुमारे 5600 कोटी रुपये अडकले आहेत.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -