घरताज्या घडामोडीअडसूळांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच ED चौकशीसाठी ताब्यात घेणार

अडसूळांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच ED चौकशीसाठी ताब्यात घेणार

Subscribe

अडसूळ यांची ईडी चौकशी करण्यासाठी ईडीचा एक अधिकारी सध्या रुग्णालयातच उपस्थित आहे.

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत होती. परंतु चौकशी दरम्यान त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील लाईफलाईन केअर रुग्णालयात अडसूळ यांना दाखल करण्यात आले आहे. अडसूळ यांची ईडी चौकशी करण्यासाठी ईडीचा एक अधिकारी सध्या रुग्णालयातच उपस्थित आहे. ज्या क्षणी अडसूळ यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल तेव्हा ईडी त्यांना ताब्यात घेईल असे सांगण्यात येत आहे. सोमवारी ईडीचे पथक अडसूळ यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झाले होते. चौकशीसाठी अडसूळ यांना ईडीने ताब्यात घेतलं होते अशा चर्चा रंगू लागल्या होत्या परंतु त्यांची तब्येत बिघडल्याने थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले.

माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करण्यात आला असून त्यांची ईडी चौकशी सुरु आहे. अडसूळ यांची चौकशी करण्यासाठी ईडीचे एक पथक मुंबईतील घरी दाखल झाले होते. यावेळी ईडीने चौकशीदरम्यान त्यांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती मिळाली होती. परंतु चौकशीदरम्यान त्यांची तब्येत बिघडल्यामुळे रुग्णावाहिकेतून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. अडसूळ सध्या रुग्णालयातच असून त्यांना सोडल्यावर ताक्काळ ईडी चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी ईडीचा एक अधिकारीही रुग्णालयात हजर आहे.

- Advertisement -

आनंदराव अडसूळ रुग्णालयात दाखल झाल्यामुळे त्यांची ईडीची चौकशी काही दिवस टळली आहे. अडसूळांवर उपचार सुरु असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. परंतु ईडीचे अधिकारी त्यांच्यावर नजर ठेऊन आहेत.

अडसूळांवर आरोप कोणते?

सिटी बँक कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स बजावलं आहे. आमदार रवी राणा यांनी अडसूळ यांच्यावर मुंबईतील सिटी बँकेत ९८० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी तक्रार देखील केली होती. या पार्श्वभूमीवर ईडीने अडसूळ पिता-पुत्रांना समन्स बजावलं आहे. आनंदराव अडसूळ यांनी सिटी बँकेत भ्रष्टाचार करत सर्वसामान्य ठेवीदार, गोरगरीब नागरिक, ज्येष्ठ पेंशनधारक यांची आयुष्यभराची जमा रक्कम आणि गिरणी कामगारांचे पैसे परस्पर लाटल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा :  शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडीचे समन्स


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -