पत्रा चाळ घोटाळा: संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची आज ईडी चौकशी

ED
वर्षा राऊत

पत्राचाळ घाटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची आज ईडी चौकशी होणार आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार वर्षा राऊतच्या खात्यातील झालेल्या व्यवहारानंतर त्यांना समन्स जारी करण्यात आले होते. याआधी जानेवारी महिन्यात वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास साडेतीन ते चार तास चौकशी केली होती.

ईडीचा आरोप काय –

खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या खात्यावरुन झालेल्या व्यवहाराबाबत राऊत माहिती देत नसल्याचा आरोप ईडीने कोर्टात केला. ज्यांच्याशी व्यवहार झाला आहे. त्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याचे ईडीने पीएमएलए कोर्टाला सांगितले. दरम्यान 1 कोटी 17 लाखाच्या व्यवहाराबाबत तपास सुरु असून यापूर्वी 1 कोटी 6 लाखांच्या व्यवहाराची माहिती मिळाल्याचे ईडीने कोर्टात सांगितले. या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ईडीने समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे.

ईडीचे दोन ठिकाणी छापे – 

ईडी पत्रा चाळ घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात  संजय राऊत यांना अटक केल्यानंतर प्रवीण राऊत, सुजित पाटकर आणि संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्यातील आर्थिक संबंध तपासले जात आहेत. या अनुषंगाने ईडीने मंगळवारी मुंबईत दोन ठिकाणी छापे टाकले.

ईडीचे संजय राऊतांवर काय आहेत आरोप – 

पत्राचाळ पुनर्विकास घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे फ्रंट मॅन म्हणून कार्यरत होते. संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्यानेच प्रवीण यांनी म्हाडाकडून आवश्यक त्या मंजुरी मिळवल्या. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात प्रवीण यांनी अवैधरीत्या मिळवलेल्या ११२ कोटी रुपयांपैकी १ कोटी ६ लाख रुपये संजय राऊत व त्यांच्या कुटुंबीयांकडे थेट गेले असल्याचे आत्तापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. ही रक्कम आणखीही असू शकते, असे आरोप ईडीने कोर्टात केले  आहेत.