घरताज्या घडामोडीअनिल देशमुख हाजिर हो... ED मार्फत पाचव्यांदा समन्स जारी

अनिल देशमुख हाजिर हो… ED मार्फत पाचव्यांदा समन्स जारी

Subscribe

अंमलबजावणी संचलनालय (ईडी) ने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉड्रिंग प्रकरणात नव्याने समन्स बजावला. तसेच बुधवारपर्यंत ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देणारा पाचवा समन्स ईडीने बजावला आहे. पैशांचा अपहार केल्या प्रकरणी हा समन्स बजावण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयनाने या प्रकरणात अनिल देशमुख यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. त्यापाठोपाठच ईडीने नव्याने समन्स बजावल्याने अनिल देशमुख यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांना ईडीच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयात १८ ऑगस्टपर्यंत हजर राहण्याच्या सूचना ईडीमार्फत देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत अनिल देशमुख यांना ईडीमार्फत बजावलेला हा पाचवा समन्स आहे. (Ed issues fresh summons anil Deshmukh in money laundering case fifth time)

अनिल देशमुख यांना प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉड्रिंग अॅक्ट (PMLA) अंतर्गत समन्स बजावण्यात आला आहे. ईडीला अनिल देशमुखांवर असलेल्या पैशांच्या अपहाराच्या प्रकरणात जबाब नोंदवून घ्यायचा आहे. त्यासाठीच ईडीने पाचव्यांदा समन्स बजावला आहे. देशमुखांनी आतापर्यंत अनेकदा ईडीच्या समन्सला कोणताही प्रतिसाद न देता गैरहजेरी लावली आहे. ईडीमार्फतच्या कारवाईवर अनिल देशमुख यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत ही अन्यायकारक अशी कारवाई असल्याचेही म्हटले आहे. अनिल देशमुख यांच्यासोबतच त्यांची पत्नी आणि मुलगा ऋषिकेश यांनाही ईडीने समन्स बजावला आहे. पण हे दोघेही ईडीसमोर हजर राहिलेले नाहीत.

- Advertisement -

अनिल देशमुख यांनी जुलै महिन्यात व्हिडिओ स्टेटमेंट नोंदवतानाच सांगितले होते की, सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगत ईडीच्या तपासाला हजर राहण्यापासून पळवाट काढली होती. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतरच मी ईडीसमोर हजर होईन असे अनिल देशमुख यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले होते.

अनिल देशमुख यांना पाठवण्यात आलेला समन्स हा पीएमएल कायद्याअंतर्गत बजावण्यात आला आहे. बदली आणि खंडणी प्रकरणात १०० कोटी वसुलीचा आरोप अनिल देशमुख यांच्याविरोधात आहे. याच कारणामुळे अनिल देशमुख यांना राजीनामाही द्यावा लागला आहे. अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांनी एप्रिल महिन्यात राजीनामा दिला होता. अनिल देशमुख यांच्या याचिकेवर निकाल आल्यानेच आता ईडीसमोर हजर राहण्याशिवाय पर्याय नाही अशीच स्थिती अनिल देशमुखांच्या बाबतीतन निर्माण झाली आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -