घरताज्या घडामोडीजप्त केलेली संपत्ती खाली करा, ईडीची एकनाथ खडसेंना नोटीस

जप्त केलेली संपत्ती खाली करा, ईडीची एकनाथ खडसेंना नोटीस

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान त्यांचे जावळी यांनासुद्धा ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवले होते. जावई गिरीश चौधरी यांनी दिवसभर चौकशी केल्यानंतर त्यांना उशिरा रात्री अटक करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. भोसरी भूखंड प्रकरणी एकनाथ खडसे (Notice to Eknath Khadse) यांच्यावर कारवाई सुरु आहे. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई यांच्यावरसुद्धा कारवाई करण्यात आली आहे. खडसेंची ईडीने ( ED) या प्रकरणामध्ये चौकशी केली होती. तसेच संपत्ती जप्त केली होती. जप्त केलेली मालमत्ता खाली करण्याचे आदेश आता ईडीकडून देण्यात आले आहे. ईडीने नोटीसद्वारे एकनाथ खडसे यांना आदेश दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर ईडीचा ससेमीरा लागला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने कारवाई केली होती. खडसेंच्या ११ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या मालमत्ता रिकाम्या करण्यात याव्यात असे आदेश देण्यात आले आहेत. एकनाथ खडसेंनी मंत्री असताना पदाचा गैरवापर केला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. खडसेंना ३० मे रोजी नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबई, नाशिक, पुणे, जळगाव, लोणावळामध्ये खडसेंची मालमत्ता आहे. ही मालमत्ता खाली करण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. येत्या १० दिवसांमध्ये मालत्ता खाली करण्यास सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान त्यांचे जावळी यांनासुद्धा ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवले होते. जावई गिरीश चौधरी यांनी दिवसभर चौकशी केल्यानंतर त्यांना उशिरा रात्री अटक करण्यात आली.

प्रकरण काय आहे?

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील भोसरी भूखंड एकनाथ खडसे यांनी खरेदी केला होता. एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना भोसरी भूखंड हा पत्नी मंदाकिनी खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी ३ कोटी ७५ लाख रुपयांना खरेदी केली होती. सर्वे क्रमांक ५२ मधील ३ एकर जागा त्यांनी खरेदी केली. जमिनीची स्टॅम्प ड्युटी म्हणून १ कोटी ३७ लाख रुपयेही भरण्यात आले. सदर जमीन एमआयडीसीच्या मालकीची आहे. व ती ९९ वर्षांच्या कराराव खरेदी करण्यात आली असल्याचे एमआयडीसीकडून सांगण्यात आले आहे. एकनाथ खडसे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन जमीन खरेदी केली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला यामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

- Advertisement -

हेही वाचा : सौरभ गांगुली यांचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा, ट्टिटरद्वारे दिली माहिती

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -