घरताज्या घडामोडीईडीचे अधिकारी राजेश्वर सिंह लवकरच भाजपमध्ये?

ईडीचे अधिकारी राजेश्वर सिंह लवकरच भाजपमध्ये?

Subscribe

राजेश्वर सिंह यांनी २०१० ते २०१८ पर्यंत, राष्ट्रकुल क्रीडा घोटाळा आणि कोळसा वाटपातील अनियमितता या प्रकरणांचा देखील तपास केला.

अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) अधिकारी राजेश्वर सिंह (Rajeshwar Singh) काही आठवड्यांत भारतीय जनता पक्षात (BJP) सामील होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील वृत्त इकॉनॉमिक्स टाईम्सने दिले आहे. राजेश्वर सिंह, मूळचे उत्तर प्रदेश पोलीस दलातील एन्काऊंटर स्पेशालिस्ट होते. २००९ मध्ये प्रतिनियुक्तीवर ईडीमध्ये कार्यरत झाले. सिंह यांनी २ जी स्पेक्ट्रम घोटाळा आणि एअरसेल-मॅक्सिस सारख्या महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये काम केले आहे.

राजेश्वर सिंह यांनी २०१० ते २०१८ पर्यंत, राष्ट्रकुल क्रीडा घोटाळा आणि कोळसा वाटपातील अनियमितता या प्रकरणांचा देखील तपास केला. तसंच ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याचा तपास करून युपीए सरकारला धक्का दिला होता. याशिवाय, माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्धच्या तपास आणि कारवाईमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दोघांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते.

- Advertisement -

राजेश्वर सिंह भ्रष्टाचाराच्या प्रकरणांच्या तपासाचा एक भाग होते, ज्यामुळे मुख्यमंत्री ओपी चौटाला, मधु कोडा आणि जगन मोहन रेड्डी यांच्यावर कारवाई झाली.

राजकीयदृष्ट्या संवेदनशील मनी लाँड्रिंग प्रकरणे हाताळत असल्याने, २०१४ मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिले. राजेश्वर सिंह यांनी इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद येथून अभियांत्रिकीचे शिक्षण  घेतले. त्यांच्याकडे कायदा आणि मानवी हक्कांशी संबंधित विषयांमध्ये पदव्या आहेत. दरम्यान, दीर्घ रजेनंतर, राजेश्वर सिंह आता ईडीच्या लखनऊ कार्यालयात तैनात आहेत. अद्याप १२ वर्षांची सेवा बाकी आहे. सरकारने २०१८ मध्ये त्यांच्याविरोधात तपास सुरू केला होता, परंतु तपासातून काहीही निष्पन्न झाले नाही.

- Advertisement -

हेही वाचा :  राज्याच्या विकासात कुणालाही आड येऊ देणार नाही, गडकरींच्या पत्राला मुख्यमंत्र्यांच उत्तर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -