घरताज्या घडामोडीपत्राचाळ घोटाळा प्रकरण : संजय राऊतांच्या जामिनाला ईडीचा विरोध

पत्राचाळ घोटाळा प्रकरण : संजय राऊतांच्या जामिनाला ईडीचा विरोध

Subscribe

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जाला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विरोध केला आहे. मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात आर्थिक घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक करण्यात आली. ईडी कोठडीनंतर सध्या संजय राऊत हे न्यायालयीन कोठडीत आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जाला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विरोध केला आहे. मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात आर्थिक घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक करण्यात आली. ईडी कोठडीनंतर सध्या संजय राऊत हे न्यायालयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी विशेष सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. राऊत यांनी दाखल केलेल्या अर्जाला ईडीने विरोध केला आहे. (ed oppose shivsena leader accused sanjay raut bail plea patra chawl scam case maharashtra)

मिळालेल्या माहितीनुसार, पत्राचाळ आर्थिक घोटाळा प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत राऊत यांना जामीन न देण्याचे ईडीने म्हटल्याचे समजते. तसेच, 1039 कोटी 79 लाखांचा पत्राचाळ घोटाळ्याचा तपास सध्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर असल्याचे ईडीने सांगितले. याआधी 8 ऑगस्ट रोजी ईडीने न्यायालयात संजय राऊतांचा सहभाग असल्याचे पुरावे असल्याचे सांगितले होते.

- Advertisement -

दरम्यान, पत्रचाळ प्रकरणातील या आर्थिक गैरव्यवहारात 1 कोटी 6 लाख आणि 1 कोटी 17 लाख ही रक्कम मिळाल्याचे पुरावे आहेत. मात्र, ही रक्कम संशयास्पद असल्याचा ईडीचा दावा आहे. याशिवाय, संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातील 1 कोटी 8 लाखाचा व्यवहारदेखील संशयास्पद असल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले. यासह अनेक संशयास्पद आर्थिक व्यवहार ईडीला सापडल्याचे समजते.

ईडीला या संशयास्पद व्यवहाराचा तपास करायचा असून, संजय राऊत हे प्रभावशाली राजकीय व्यक्तीमत्व असल्याने तपासात आणि साक्षीदारांवर ते प्रभाव टाकू शकतात, असे ईडीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

- Advertisement -

यावेळी इडीच्या वकीलांनी एका महिला साक्षीदाराला संजय राऊत यांनी धमकी दिल्याची बाब ईडीने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत राऊत यांना जामीन नाकारण्यात यावा अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली.


हेही वाचा – महाविकास आघाडीने महाराष्ट्राला खाली आणले; फडणवीसांचा आरोप

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -