कैद्यांना मतदानाचा अधिकार नसतो, देशमुख-मलिकांच्या मतदानाला ईडीचा विरोध

नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहेत. ते या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. कैद्यांना लोकप्रतिनिधित्व कायद्यांतर्गत मतदानाचा हक्क नसतो.

ED opposes anil Deshmukh nawab Malik voting application

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी पक्षातील प्रत्येक आमदाराचे मत मौल्यवान आहे. परंतु महाविकास आघाडी सरकामधील दोन आमदार सध्या जेलमध्ये आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक जेलमध्ये आहेत. १० जून रोजी राज्यसभा सदस्यांच्या निवडणुकीसाठी आपल्याला मतदान करण्यास परवानगी द्यावी असे अर्ज मलिक आणि देशमुखांनी केले आहेत. परंतु या अर्जाला ईडीने विरोध केला आहे. कैद्यांना मतदानाचा अधिकार नसतो असे ईडीने आपल्या प्रतिज्ञा पत्रात म्हटलं आहे.

राज्यसभा निवडणूक येत्या १० जून रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदान करण्यास परवानगी देण्यात यावी यासाठी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी अर्ज केला आहे. परंतु या अर्जाला विरोध करत ईडीने आपले प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. ईडीच्या विरोधानंतर आता कोर्ट काय निर्यण देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीसाठी दोन आमदारांचे मत फार महत्त्वाचे आहे. महाविकास आघाडीकडून ४ उमेदवार राज्यसभेच्या रिंगणात आहेत. दरम्यान ईडीने आपल्या प्रतिज्ञा पत्रात असं म्हटलं आहे की, नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहेत. ते या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. कैद्यांना लोकप्रतिनिधित्व कायद्यांतर्गत मतदानाचा हक्क नसतो. त्यामुळे एका दिवसाच्या जामिनाबाबत केलेला अर्ज फेटाळून लावण्यात यावा असे ईडीने कोर्टाकडे म्हटलं आहे.

नवाब मलिक- अनिल देशमुखांच्या अर्जावर उद्या सुनावणी 

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. ईडीने दोघांच्याही जामीन अर्जाला विरोध केल्यामुळे कोर्ट सुनवाणीदरम्यान काय निर्णय़ देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीसाठी मतांची कमतरता आहे. त्यामुळे या दोन्ही आमदारांचे मत चौथ्या उमेदवारासाठी महत्त्वाचे आहे. दरम्यान अर्ज फेटाळ्यास महाविकास आघाडी सरकार उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात जाणार का याबाबत उद्या चित्र स्पष्ट होईल. तर मलिक-देशमुखांना सोडल्यास एकूण २८५ आमदार मतदान करतील. एका आमदाराचे निधन झाल्यामुळे २८७ आमदारांचे मतदान होणार आहे.


हेही वाचा : मी माफीचा साक्षीदार, आता नेमंक काय करायचं?, सचिन वाझेंचा कोर्टात प्रश्न