नागपुरातील केएसएल इंडस्ट्रीच्या मालकीच्या एम्प्रेस मॉलवर EDची कारवाई

ed raid on Empress mall in nagpur
नागपुरातील केएसएल इंडस्ट्रीच्या मालकीच्या एम्प्रेस मॉलवर EDची कारवाई

आज, गुरुवारी ईडी महाराष्ट्रात जास्त सक्रिय असल्याची दिसून आली. आज दुपारी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असलेल्या महाराष्ट्र वक्फ बोर्ड जमीन प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली. या गैरव्यवहार प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल करत मुंबई, पुणे आणि औरंगाबादसह ७ ठिकाणी छापे टाकले. मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे सासरे पद्माकर मुळेंच्या कार्यालयावर छापेमारी केल्याची माहिती समोर आले. त्यानंतर आता नागपुरातील एम्प्रेस मॉलवर ईडी कारवाई केली आहे.

नागपुरातील ईडीने कारवाई केलेला एम्प्रेस मॉल हा केएसएल इंडस्ट्रीच्या मालकीचा आहे. आता ईडीने या मॉलवर कारवाई करून तो ताब्यात घेतला आहे. केएसएल इंडस्ट्रीजने बँक ऑफ इंडिया, आंध्रा बँकेकडून कोट्यावधींचे कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड नियमितपणे झाले नाही त्यामुळे ईडीने कोट्यावधींच्या फसवणुकीप्रकरणी एम्प्रेस मॉलवर कारवाई केली.

माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून एम्प्रेस मॉलवर ईडीची कारवाई सुरू होती. केएसएलने यासंदर्भात न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळाला नाही, त्यानंतर ईडीने आज कारवाई करून ताबा घेतला.


हेही वाचा – औरंगाबादेत ईडीचे छापासत्र : विश्वास नांगरे पाटील यांच्या सासऱ्यांविरोधात मोठी कारवाई