घरमहाराष्ट्रआमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टवर ईडीची धाड

आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टवर ईडीची धाड

Subscribe

मनी लाँडरिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टवर ईडीने मंगळवारी धाड टाकली. ईडीचे अधिकारी सध्या रिसॉर्टची चौकशी करत आहेत. एनएसईएल म्हणजेच नॅशनल स्पोर्ट्स एक्सचेंज लिमिटेड प्रकरणात धाड टाकण्यात आली आहे. ईडीच्या या धाडीमुळे सरनाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळा येथील रिसॉर्ट वर ईडीचा रेड सुरू आहे. हे प्रकरण एनएसईएल म्हणजेच नॅशनल स्पोर्ट्स एक्सचेंज लिमिटेडचे प्रकरण आहे, ज्यात यावर्षी एप्रिल महिन्यात बिल्डर योगेश देशमुखला अटक करण्यात आली होती. हे प्रकरण सुमारे ५५०० कोटींच्या सावकारीशी संबंधित आहे, या प्रकरणात आमदार प्रताप सरनाईक यांना हवे होते. दरम्यान, ईडीचे सह संचालक सत्यव्रत कुमार यांनी तपास सुरू असून याबाबत सध्या काही बोलणे उचित नाही असं ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितलं.

- Advertisement -

योगेश देशमुख इडीच्या ताब्यात

कल्याण मधील एक प्रथितयश बिल्डर योगेश देशमुख यांना ६ एप्रिलला रात्री उशिरा ईडीने अटक केली होती. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी योगेश देशमुख यांचे आर्थिक संबंध होते. तसंच टिटवाळा नजीक गुरवली येथील ७८ एकर जागा देखील प्रताप सरनाईक यांनी देशमुख यांच्याकडून खरेदी केल्याचे पुरावे इडीला चौकशीत मिळाल्याचे सांगण्यात येते.

प्रताप सरनाईक गायब? – किरीट सोमय्या

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत प्रताप सरनाईक गायब आहेत का? असा सवाल केला आहे. किरीट सोमय्या सातत्याने शिवसेनेच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. सोमय्या गेले काही दिवस प्रताप सरनाईक गायब असल्याचं ट्विट करत होते. आज पुन्हा एकदा त्यांनी प्रताप सरनाईक गायब? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -