घरताज्या घडामोडीशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीचा छापा

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीचा छापा

Subscribe

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र पूर्वेश सरनाईक आणि विहंग सरनाईक यांच्या घरीही ईडीचे पथक दाखल झाले आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरासह त्यांच्या कार्यालयावर छापा टाकला असून तपास सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार टॉप सिक्युरिटिज प्रकरणाशी संबंधतीत ईडीने छापा टाकला आहे. इतकेच नाही तर शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना देखील ईडीने नोटीसा पाठवल्याची माहिती मिळतेय.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात ईडीचे पथक दाखल झाले. सकाळी आठ वाजता ही कारवाई करण्यात आली असून एकूण १० ठिकाणी धाड टाकण्यात आली आहे. कारवाईचे नेमकं कारण अद्यापही समोर आलेले नाही. दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत.

- Advertisement -

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगन रणौत प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी आवाज उठवला होता. प्रताप सरनाईक यांचा आवाज दाबण्यासाठी तसेच कोंडी करण्यासाठी कारवाई केल्याची चर्चा आहे. मात्र भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना या कारवाईचा राजकारणाशी काही संबंध नसल्याचे म्हटले आहे. बेनामी कारभार, बोगस कंपन्या असतील, भ्रष्टाचार केला असेल तर कारवाई झालीच पाहिजे असे म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कारवाईचे स्वागत केले आहे. शिवसेना गैरव्यवहार करण्यात पटाईत आहेत, असा गंभीर दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -