Ed Raids : अनिल परबांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरी ईडीची धाड, ‘IT’ने केली होती छापेमारी

आयकर विभागाकडून यापूर्वी संजय कदम यांच्या घरी छापेमारी करण्यात आली होती.

ED raids Shiv Sena office bearer house in a related with Anil Parab

राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या संबंधित ७ जागेवर ईडीने पहाटे साडे सहा वाजता छापेमारी केली आहे. अनिल परब यांचे शासकिय निवासस्थान आणि वांद्रे येथील खासगी निवासस्थानी छापेमारी केली. मुंबई, पुणे आणि रत्नागिरीमध्येसुद्धा कारवाई झाली. दरम्यान यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि परब यांचे निकटवर्तीय असणाऱ्या संजय कदम यांच्या घरीसुद्धा ईडीने छापेमारी केली आहे.

शिवसेनेचे पदाधिकारी आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्या अंधेरी येथील घरी छापेमारी करण्यात आली आहे. अंधेरीतील पश्चिम शिवसेना विभाग संघटक हे संजय कदम आहेत. परब यांच्यासह संजय कदम यांच्याघरीसुद्धा सकाळी साडेसहा वाजता ईडीचे पथक छापा टाकण्यासाठी पोहचले होते. कदमांच्या घरातही छापेमारी करण्यात आली आहे.

आयकरच्या छापेमारीत महत्त्वाचे कागदपत्र जप्त

आयकर विभागाकडून यापूर्वी संजय कदम यांच्या घरी छापेमारी करण्यात आली होती. दीर्घकाळ ही छापेमारी सुरु होती. दोन दिवस आणि दोन रात्र छापेमारी सुरु होती. आयकरने महत्त्वाचे कागदपत्रे सजंय कदम यांच्या घरातून जप्त केली होती. तसेच परब यांच्या सीएच्या घरीसुद्धा छापेमारी केली होती. यावेळी महत्त्वाचे कागदपत्रे जप्त करण्यात आले होते.

अनिल परबांसंबंधित ७ ठिकाणी छापेमारी

अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान, शिवालय- अजिंक्यतारा
परब यांच्या वांद्रे येथील खासगी निवासस्थानी छापेमारी
पुण्यातील विभास साठे यांच्या घरी, साठेंकडून परबांनी दापोलीतील जमीन खरेदी केली.
विभास साठे यांच्या कोथरुडमधील कार्यालयात छापा
दापोलीतील परबांचा साई रिसॉर्ट एन एक्स
अधेरीतील शिवसेना पदाधिकारी संजय कदम यांच्या निवासस्थानी
परबांसंबंधित चेंबूरमधील बांधकाम व्यावसायिकाच्या घरी छापेमारी

अनिल परबांवर आरोप कोणते? 

शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासंबंधित ७ जागांवर ईडीने छापेमारी केली होती. अनिल परब यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोलीतील रिसॉर्ट आणि पोलिसांच्या बदल्यांमध्ये झालेला घोटाळा या प्रकरणी ईडी चौकशी करत आहे. यापूर्वीसुद्धा अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचार आणि घोटाळ्यासंदर्भात आरोप करण्यात आले आहेत. तसेच ५ ते ६ प्रकरणांवर चौकशीसुद्धा सुरु आहे.


हेही वाचा : केंद्रीय यंत्रणांना कारवाईचा अधिकार पण गैरवापर होऊ नये, अजित पवारांची ईडीच्या छापेमारीवर प्रतिक्रिया