घरमहाराष्ट्रभावना गवळींना चिकनगुनिया, ईडी चौकशीसाठी हजर राहणार नाहीत

भावना गवळींना चिकनगुनिया, ईडी चौकशीसाठी हजर राहणार नाहीत

Subscribe

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आज ईडी चौकशीसाठी हजर राहणार नाहीत. त्यांना चिकनगुनियाची लागण झाली असून त्यांनी १५ दिवसांचा अवधी ईडीकडे मागून घेतला आहे. भावना गवळी यांना ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावला असून आज त्यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.

भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये १७ कोटींच्या कथीत गैरव्यवहाराप्रकरणी सध्या ईडीकडून चौकशी सुरु आहे. याआधीसुद्धा भावना गवळी यांना ईडीने समन्स बजावून ४ ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र, त्या गैरहजर राहिल्या. त्यामुळे ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावत आज ईडी चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, आज देखील गैरहजर राहणार आहेत. चिकनगुनियाची सबब देत त्यांनी १५ दिवसांचा अवधी मागून घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणी गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये बदल करुन कंपनीत रुपांतर केल्याप्रकरणी संचालक सईद खानला ईडीने अटक केली आहे.

- Advertisement -

भावना गवळींवर नेमके आरोप काय?

भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टमध्ये १७ कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडी तपास करत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कोऑपरेशनकडून बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डाने ४३.३५ कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हरिष सारडा यांनी भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून कर्ज घेतलं होतं मात्र, ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती असा दावा आपल्या तक्रारीमध्ये केला आहे.

याशिवाय, भावना अ‌ॅग्रो प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस कंपनीमध्ये अनियमितता केल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. या कंपनीसाठी दोन वेगवेगळ्या बँकांकडून ७.५ कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. नंतर ही कंपनी भावना गवळी यांच्या खासगी सचिवाला ७.९ कोटी रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला होता.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -