घर देश-विदेश ED म्हणजे भाजपचं इलेक्शन डिपार्टमेंट; अजित पवारांच्या बंडखोरीवर कन्हैया कुमारांचा हल्लाबोल

ED म्हणजे भाजपचं इलेक्शन डिपार्टमेंट; अजित पवारांच्या बंडखोरीवर कन्हैया कुमारांचा हल्लाबोल

Subscribe

काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी आता राष्ट्रवादी फुटीवर वक्तव्य केलं आहे. याबाबत बोलत असताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 4 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांवर सिंचन घोटाळ्यांचे आरोप केले मात्र, अजित पवार हे भाजपसोबत जाऊन सत्तेत बसले आणि त्यानंतर ईडी अजित पवार यांच्या घरचा रस्ता विसरली , असा हल्लाबोल कन्हैय्या कुमार यांनी केला आहे.

कोल्हापूर: काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी आता राष्ट्रवादी फुटीवर वक्तव्य केलं आहे. याबाबत बोलत असताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 4 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांवर सिंचन घोटाळ्यांचे आरोप केले मात्र, अजित पवार हे भाजपसोबत जाऊन सत्तेत बसले आणि त्यानंतर ईडी अजित पवार यांच्या घरचा रस्ता विसरली , असा हल्लाबोल कन्हैया कुमार यांनी केला आहे. कोल्हापुरात  ते एका कार्यक्रमात बोलत होते. (ED stands for Election Department of BJP Talking about the split of NCP Kanhaiya Kumar attacked BJP talked about Ajit pawar )

कन्हैया कुमार म्हणाले की, ईडी म्हणजे भाजपचं इलेक्शन डिपार्टमेंट आहे. कन्हैया कुमार म्हणाले की, परिवार वाद भाजपमध्ये योग्य असतो. परंतु काँग्रेसमध्ये असेल तर तो मात्र गैर ठरतो. कन्हैया पुढे म्हणाले की, जेव्हा अजित पवार महाविकास आघाडीत होते तेव्हा त्यांनी 75 हजार करोड रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. आता अजित पवार जसेच, भाजपात सामील झाले. तसंच, त्यांच्या घरचा रस्ता ईडी विसरली आहे. त्यांना कदाचित अजित पवारांच्या घरचा पत्ता माहित नसेल, असं म्हणत कन्हैया कुमार यांनी भाजपला खोचक टोला लगावला. भाजप देशातील लोकांना जाती आणि धर्मात अडकवून ठेवत आपलं मत घेत आहेत आणि जसंच ते गादीवर विराजमान होतात हे नेते आपल्या मुलांना शिक्षणासाठी विदेशात पाठवत आहेत आणि आपली मुलं काय तर दंगलखोर बनवत आहेत. हा प्रश्न आपल्या सर्वांसमोर अत्यंत गंभीर असल्याचं म्हणत, कन्हैय्या यांनी भाजपवर दंगल भडकवण्याचा आरोप केला आहे.

- Advertisement -

कोणताही नेता किंवा कार्यकर्ता ज्याच्या मागे ईडी लागली आहे. ज्याने भ्रष्टाचार केला आहे. तो चुकीचा असेल तर तो चुकीचा आहेच. भाजपात जाऊन तो काही शुद्ध होत नाही, असं म्हणत कन्हैया यांनी संताप व्यक्त केला. भाजपची एक रणनिती ठरेलली आहे. भाजप आधी ईडीला पाठवतं, ईडीचा उल्लेख यावेळी कन्हैया कुमार यांनी इलेक्शन डिपार्टमेंट असा केला. ईडी नेत्याच्या घरी जाऊन त्याला घाबरवते आणि जर नेता घाबरला तर तत्काळ त्याला भाजपात येण्याची ऑफर दिली जाते. त्या नेत्याला भाजपात घेऊन त्याचे सगळे गुन्हे माफ केले जातात. ज्या नेत्याच्या घरात ईडी दाखल होते, तशीच भाजपा तो नेता चोर आहे, असं ओरडणं सुरू करते. त्यातच जर संबंधित नेत्याने भाजपात प्रवेश केला की त्याला लगेच साधू साधू म्हटलं जात. संत, महात्मा असे उद्गार त्या नेत्यासाठी काढले जातात, असं म्हणत कन्हैया कुमार यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर टीकास्त्र डागलं.

( हेही वाचा: ‘तुरुंगाच्या भीतीने भूमिका बदलणाऱ्या भेकड प्रवृत्तींना सामान्य लोक वेगळ्या ठिकाणी पाठवल्याशिवाय राहाणार नाही’ )

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -