घरताज्या घडामोडीपत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरण : संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊतांनाही ईडीचा समन्स

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरण : संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊतांनाही ईडीचा समन्स

Subscribe

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांना काही दिवसांपूर्वी अटक केली. अटकेनंतर पहिला तीन दिवस आणि आज त्यांना न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स पाठवले आहे.

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांना काही दिवसांपूर्वी अटक केली. अटकेनंतर पहिला तीन दिवस आणि आज त्यांना न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स पाठवले आहे. पत्राचाळ प्रकरणी वर्षा राऊत यांच्या खात्यावरील व्यवहार उघडकीस आल्याने ईडीने हे समन्स बजावले आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीसमोर हजर राहावे लागणार आहे. तसेच, आपली बाजू मांडावी लागणार आहे. (Ed Summons Sanjay Rauts Wife Varsha Raut In The Patra Chawl Land Case)

गुरूवारी सकाळी संजय राऊत यांच्याबाबत न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर ईडीने वर्षा राऊत यांना समन्स पाठवले. ईडीच्या वकिलांनी गुरुवारी न्यायालयात वर्षा राऊत यांचा आर्थिक गैरव्यवहारात सहभाग असल्यासंदर्भात भाष्य केले होते. ईडीने राऊतांच्या घरावर छापा टाकल्यानंतर काही कागदपत्रे हाती लागली होती. त्यावरून असा समज काढला जात आहे की, संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातून काही व्यक्तींना मोठी रक्कम पाठवली गेली आहे. त्यांच्या खात्यातून मोठ्याप्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले आहेत.

- Advertisement -

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी प्रवीण राऊत यांना HDIL ग्रुपकडून ११२ कोटी रुपये पाठवण्यात आले. त्यातील १ कोटी ६ लाख ४४ हजार रुपये वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले, अशी माहिती ईडीच्या वकिलांनी न्यायालयात दिली होती. त्यामुळे आता वर्षा राऊत मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

ईडीने सोमवारी संजय राऊतांना मनीलाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) न्यायालयाचे न्यायाधीश एम जी देशपांडे यांच्यासमोर हजर केले आणि त्यांची आठ दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु न्यायालयाने त्यांना ८ ऑगस्टपर्यंतची कोठडी सुनावली.

- Advertisement -

पत्राचाळीतील घोटाळ्याच्या आरोपा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने 31 जुलैला अटक केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोर्टाने त्यांना तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. आज त्यांना पुन्हा चार दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र न्यायालयात ईडीच्या वकीलांनी आणि संजय राऊतांच्या वकिलांनी युक्तीवादात काय म्हटले आपण जाणून घेऊयात.

ईडीच्या वकिलांचा युक्तीवाद –

पत्राचाळ पुनर्विकास घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे फ्रंट मॅन म्हणून कार्यरत होते. संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्यानेच प्रवीण यांनी म्हाडाकडून आवश्यक त्या मंजुरी मिळवल्या. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात प्रवीण यांनी अवैधरीत्या मिळवलेल्या ११२ कोटी रुपयांपैकी १ कोटी ६ लाख रुपये संजय राऊत व त्यांच्या कुटुंबीयांकडे थेट गेले असल्याचे आत्तापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. ही रक्कम आणखीही असू शकते, असा दावा ईडीने कोर्टात केला आहे.

राऊत यांच्या वकिलांचा युक्तीवाद –

दोन नवीन आरोप करण्यात आले आहेत. अनोळखी व्यक्तीकडून राऊत यांना पैसे मिळाले तसेच अलिबाग येथील जमिनीच्या खरेदी प्रकरणाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. यात रोख रकमेचा वापर करण्यात आल्याचा ईडीचा आरोप आहे. मात्र, हे आरोप नवे नाहीत. याआधीही या आरोपांप्रकरणी चौकशी झालेली आहे. मात्र, ईडीकडून दबाव आणला जात आहे, धमकावले जात आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांच्या विकलांनी ईडीवर केला आहे.


हेही वाचा – पत्राचाळ प्रकरण : संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -