कोरोनामुक्तीनंतर सोनिया गांधी ईडी चौकशीसाठी हजर राहणार

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी नॅशनल हेराल्ड (National Herald) प्रकरणी चौकशीसाठी इडी कार्यालयात हजर राहणार आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी मनी लॉन्ड्रींगची चौकशी करण्यासाठी ईडीने सोनिया गांधींना समन्स बजावले आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी नॅशनल हेराल्ड (National Herald) प्रकरणी चौकशीसाठी इडी कार्यालयात हजर राहणार आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी मनी लॉन्ड्रींगची चौकशी करण्यासाठी ईडीने सोनिया गांधींना समन्स बजावले आहे. दरम्यान, या ईडी चौकशीच्या निषेधार्थ केंद्र सरकार विरोधात आज काँग्रेसचे (Congress) नेते मुंबईच्या ईडी कार्यालयावर (Mumbai ED) मोर्चा काढणार आहेत. काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढला जाणार आहे. (ed summons sonia gandhi will interrogate on today july 21 congress protest from street to parliament)

ईडी विरोधात काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार असून गुरूवारी सकाळी ११ वाजता मुंबईच्या ईडी कार्यालयावर काँग्रेस नेते मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा गुरूवारी सकाळी ११ वाजता जीपोओ चौकातून निघणार असून, नाना पटोले, भाई जगताप, अशोक चव्हाण, चरणसिंह सप्रा यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.

महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेसकडून ईडीविरोधात आंदोलनं केली जाणार आहेत. दरम्यान, मागील माहिन्यात नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी यांची ईडी चौकशी झाली होती. त्यावेळीही ईडीविरोधात काँग्रेसने देशभरात आंदोलन केले होते. त्यावेळी काँग्रेसने दिल्लीत जबरदस्त निदर्शने करत मोदी सरकारवर राजकीय सूडबुद्धीचा आरोप केला होता. तसेच, गांधी कुटुंबावरील मनी लाँड्रिंगचे आरोप निराधार असल्याचे म्हटले होते.

ईडीने सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र, सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना ईडी चौकशीसाठी उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे त्यांनी ईडीकडे पुढची तारीख मागितली होती. परंतु, राहुल गांधी मात्र ईडी चौकशीसाठी उपस्थित राहिले होते.

राहुल गांधींची 5 दिवसांत जवळपास 50 तासांसाठी चौकशी करण्यात आली होती. तेव्हा कांग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सलग 5 दिवस ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन केले होते.


हेही वाचा – विदर्भ, मराठवाड्याला मुसळधार पावसाचा फटका; शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान