घरमहाराष्ट्रअनिल देशमुख यांच्या मुलाचीही ईडी करणार चौकशी

अनिल देशमुख यांच्या मुलाचीही ईडी करणार चौकशी

Subscribe

उरणमधील जमिनीचे प्रकरण, ईडीकडून समन्स बजावले जाणार

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे दुसरे पुत्र सलील देशमुख यांच्या उरण येथील जमिनीच्या व्यवहाराबाबत ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात चौकशीसाठी ईडीकडून सलील देशमुख यांना समन्स जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे दुसरे सुपुत्र सलील देशमुख यांची गुंतवणूक असलेल्या उरण तालुक्यातील धुटूम गाव येथील प्रीमिअर पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने १५ प्लॉट खरेदी केले आहेत. या प्लॉटची किंमत जवळपास ३००कोटी रुपयांच्या घरात असल्याचे समजते.

- Advertisement -

८.३ एकर असलेली ही जमीन पळस्पे फाटा ते जेएनपीटी परिसरात असल्याचे समजते. जमीन खरेदी करणारी कंपनी अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील चालवत असल्याची माहिती समोर आली असल्यामुळे ईडीकडून या जमिनीच्या व्यवहाराबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. याबाबत सलील देशमुख यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -