घरमहाराष्ट्रप्रताप सरनाईकांची 11 कोटींची संपत्ती ईडी घेणार ताब्यात

प्रताप सरनाईकांची 11 कोटींची संपत्ती ईडी घेणार ताब्यात

Subscribe

येत्या काही दिवसांत ही कारवाई करण्यात येईल

शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत आता आणखीनच वाढ होणार आहे. प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात आली होती. ”शिवसेनेत असल्याने भाजपने सूडबुद्धीने वागून ईडीची कारवाई केली असा आरोप प्रताप सरनाईक यांनीच केला होता. पण आता शिंदे गटात जाऊनही सरनाईक यांची संपत्ती ईडी जप्त करणार आहे. त्यामुळे सरनाईकांसमोरील अडचणीत वाढ होणार आहे. (ED will take possession of Tap Sarnaik’s property worth 11 crores)

हे ही वाचा – सरकारी नोकर भरतीत पारदर्शकता येणार; महामेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यांनतर शिवसेनेचे अनेक आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत गेले होते. त्यात प्रताप सरनाईक यांचा देखील समावेश होता. महाविकास आघाडीच्या काळात सरनाईक यांच्यावर ईडीने छापेमारी करत कारवाई केली होती. पण या सगळ्यानंतर प्रताप सरनाईक काही प्रमाणात बाजुला झाले. सुरुवातीला शिवसेनेचे नेते त्यांची बाजू मांडत होते, पण नंतर फारसे लक्ष दिले जात नसल्याने प्रताप सरनाईक नाराज असल्याचेही बोलले जात होते. यानंतर शिंदे गटात गेल्याने ईडीची कारवाई थांबली की काय, असा खोचक प्रश्न शिवसेनेकडून विचारण्यात येत होता.

याच संदर्भांत एक मोठे वृत्त समोर आले आहे. प्रताप सरनाईकांची संपत्ती जप्त करण्यासाठी आता ईडीने पुन्हा हालचाली सुरु केल्या आहेत. यासाठी ईडीने परवानगी मिळविली असून सरनाईकांची पहिल्या टप्प्यात 11 कोटींची मालमत्ता जप्त केली जाणार आहे. यामध्ये ठाणे येथे असेलेले दोन फ्लॅट आणि मीरारोडमधील कोट्यवधी किंमतीचा प्लॉट ईडी ताब्यात घेणार आहे. येत्या काही दिवसांत ही कारवाई करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा –  …म्हणून मंत्रिमंडळ विस्तार होत नाही; अंबादास दानवेंची खोचक टीका

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -