घरमहाराष्ट्रअर्जुन खोतकरांवर ईडीची कारवाई, ७८ कोटींच्या संपत्तीवर टाच

अर्जुन खोतकरांवर ईडीची कारवाई, ७८ कोटींच्या संपत्तीवर टाच

Subscribe

कारवाईत साखर कारखान्याची जमीन जप्त करण्यात आली आहे. अवैध लिलाव केल्याप्रकरणी ही कारवाई झाल्याचे समोर आले आहे.

बंडखोर आमदारांमुळे ठाकरे सरकार धोक्यात आलेले असतानाच शिवसेनेचा अजून एक नेता अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आला आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या जालना येथील साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. या कारवाईत साखर कारखान्याची जमीन जप्त करण्यात आली आहे. अवैध लिलाव केल्याप्रकरणी ही कारवाई झाल्याचे समोर आले आहे. (ED’s action against Arjun Khotkar, heel on assets worth Rs 78 crore)

हेही वाचा – मुंबईत २७ जूनपासून १० टक्के पाणीकपात; तलावांत फक्त १० टक्के पाणीसाठा शिल्लक

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेद्वारे सहकारी साखर कारखान्यांच्या बेकायदेशीर लिलावाशी संबंधित प्रकरणात ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गत जालन्यातील सावरगाव येथील सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवर जप्ती आणली आहे. या कारवाईत ईडीने इमारत, प्लांट आणि यंत्रसामुग्रीवर टाच आणल्याची माहिती आहे. जप्त केलेली ही मालमत्ता ७८.३८ कोटींची असल्याची माहिती ईडीने दिली आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २६ ऑगस्ट २०१९ रोजी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने हा तपास सुरू केला आहे. हा एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाच्या २२ ऑगस्ट २०१९च्या आदेशानुसार नोंदविण्यात आला होता. दोन महिन्यांपूर्वी ईडीने साखर कारखान्यावर निर्बंध लावण्याचे आदेश दिले होते. जालन्याच्या जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहून कारखान्यावर निर्बंध लावण्याचे आदेश ईडीने दिले होते. या कारखान्याचा वापर, विक्री आणि व्यवहार करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते.

- Advertisement -

मेसर्स जालना सहकारी साखर कारखान्याची स्थापना १९८४-८५मध्ये सुमारे २३५ एकर जमिनीवर करण्यात आली होती. त्यात १०० एकर जमीन महाराष्ट्र सरकारकडून कोणत्याही आर्थिक मोबदल्याशिवाय मिळाली होती. एमएससीबीने दिलेल्या कर्जाची परतफेड करण्यात कारखाना अयशस्वी ठरल्याचे तपासणीत दिसून आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -