घरमहाराष्ट्रशिक्षणमंत्र्यांची शिक्षक भरतीची घोषणा हवेतच

शिक्षणमंत्र्यांची शिक्षक भरतीची घोषणा हवेतच

Subscribe

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी २४ हजार शिक्षक भरतीची केलेली घोषणा हवेतच विरली आहे.

काही महिन्यांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी २४ हजार शिक्षकांची भरती केली जाईल अशी घोषणा केली होती. मात्र ही घोषणा हावेवरच राहिली आहे. सध्या शिक्षक भरती हा विषय चर्चेत असून भरती प्रक्रियेत सुमारे १० हजार ८०० जागाच भरल्या जातील, असे चित्र दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतील भरती अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीतील गुणांच्या आधारे केली जाईल. तसेच अल्पसंख्याक शाळा, स्वयं अर्थसहाय्यीत शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, अनुकंपा तत्त्वावरील भरती या सर्व संस्थांमधील शिक्षक भरती प्रणालीतून वगळण्यात आल्याने जागा कमी झाल्या आहेत.

दरम्यान, १ लाख २१ हजार उमेदवारांमधून फक्त १० हजार ८०० जागांवरच शिक्षक भरती होणार आहेत. त्यामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या २ हजार ३०० जागांचा समावेश आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ८ हजार ५०० जागांचा समावेश आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकांना आदेश देण्यात आले की, जो पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांतील शिक्षक भरतीसाठी रोस्टरमध्ये संबंधीत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत अद्यावत करु नयेत. यासंबंधीत उपोषण करणाऱ्यांना शिक्षण आयुक्तांनी त्यांना आवाहन केले आहे.

साधारणपणे दहा ते १५ हजार जागांवर भरती होण्याची शक्यता आहे. शिक्षक भरतीसाठी उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांशी संवाद साधून त्यांना सुरू असलेल्या प्रक्रियेची माहिती दिली. तसेच उपोषण सोडून मुलाखतीची तयारी करण्याचेही आवाहन केले.

– विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त

- Advertisement -

शिक्षक भरतीसाठीची परीक्षा घेऊन १४ महिने उलटले तरीही २४००० जागांच्या भरतीचा विषय हा ऐरणीवरच आहे. त्यामुळेच बेरोजगार अभियोग्यताधारकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. संतप्त अभियोग्यताधारकांनी थेट पुणे शिक्षण आयुक्तांकडे धडक मारली आहे. १२ फेब्रुवारीला म्हणजे आज बेरोजगार अभियोग्यताधारकांनी धाव नाही तर धडक मोर्चाच काढण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -