घरताज्या घडामोडी१० वी, १२वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा

१० वी, १२वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा

Subscribe

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार परीक्षा

मागील काहीदिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. मे महिन्याच्या अखेरी दहावी आणि जूनमध्ये बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे. परंतु राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग पसरला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यामध्ये व्हिसीच्या माध्यामातून बैठक झाली, या बैठकीत दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत चर्चा करण्यात आली. दहावी आणि बारावीची परीक्षा ऐन मोक्यावर आली असताना राज्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. रुग्णांची वाढणाऱ्या संख्येमुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य हा सर्वात मोठा प्रश्न असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. तर दहावीच्या परीक्षा या मे अखेरीस तर बारावीच्या परीक्षा जूनमध्ये घेण्यात येणार आहेत. यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही. तसेच इतर बोर्डांनाही परीक्षा पुढे ढकलण्यास सांगण्यात येणार असल्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

तसेच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे पुन्हा नव्याने नियोजन करण्यात येणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार या परीक्षा घेण्यात येणार आहे. मे महिन्याच्या अखेरीस दहावीच्या तर जूनमध्ये बारावीची परीक्षा घेण्यात येईल. यासाठी नव्याने वेळापत्रक जारी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत ९वी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय घेतला. राज्यात कोरोना रुग्णांची मोठ्या संख्येने नोंद होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता हा निर्णय घेतला गेला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -