घरमहाराष्ट्रकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या मराठा नेत्यांनी कुटुंबाची खळगी भरली - विनोद तावडे

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मराठा नेत्यांनी कुटुंबाची खळगी भरली – विनोद तावडे

Subscribe

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मराठा नेत्यांनी याआधी फक्त स्वत:च्या कुटुंबाची खळगी भरून घेतली असा खळबळजनक आरोप शिक्षणमंत्री आणि मराठा आरक्षणासंदर्भातल्या समितीचे सदस्य विनोद तावडे यांनी केला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरून एकीकडे वातावरण तापत असताना आता त्यावरून आरोप-प्रत्यारोपही सुरु झाले आहेत.

महाराष्ट्रात सध्या एकीकडे मराठा आरक्षणावरून वातावरण तापलेले असताना आता राजकीय आरोप-प्रत्यारोपाला देखील सुरुवात झाली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फक्त स्वत:च्या कुटुंबाची खळगी भरली, असा आरोप केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्याचा राजकीय वापर होतोय का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी हा आरोप केला आहे. त्यामुळे, मराठा आंदोलनासोबतच राजकीय स्तरावरही वातावरण तापू लागलं आहे. “काही ठिकाणी राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न होतही आहे. पण समाजाला माहीत आहे, काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केवळ आपल्या कुटुंबाचा उद्धार केला. समाजाचे हित पाहिले नाही,” अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.

‘समाज सुजाण आहे’

“देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या सरकारने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना अनेक सोयी सुविधा दिल्या आहेत. सर्व अभ्यासक्रमामात ८ लाख रुपायांखाली वार्षिक उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात ५० टक्के अनुदान दिले आहे. त्यामुळे या मुद्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न केला तरी हा समाज आता सुजाण आहे,” अशा शब्दांत विनोद तावडे यांनी राज्य सरकारची भूमिका यावेळी स्पष्ट केली.

- Advertisement -

‘उच्च न्यायालयानेच स्थगिती दिली’

दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावर विनोद तावडे यांनी थेट न्यायालयाकडे बोट दाखवले आहे. “देवेंद्र फडणवीस सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले आहे. मात्र, न्यायालयानेच स्थगिती दिली आहे,” असे सांगून मराठा आरक्षणा संदर्भात मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे सदस्य शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी हात वर केले आहेत. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मराठा क्रांती मोर्चाने बंद घोषित केला आहे.

शाळा-महाविद्यालयांचा निर्णय स्थानिक प्रशासनावर

मराठा समन्वय समितीने आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी मुंबई बंदची हाक दिली आहे. त्यामुळे यावेळी शाळा, महाविद्यालयांची काय परिस्थिती असेल? याबाबत विनोद तावडे यांनी निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपवला आहे. यासंदर्भात स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घ्यायचा असल्याचं विनोद तावडे यांनी यावेळी जाहीर केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -