घरताज्या घडामोडीविरोधी आमदारांच्या मतदारसंघात शासकीय योजना प्रभावीपणे राबवा'; राधाकृष्ण विखे-पाटील यांचे यंत्रणांना आदेश

विरोधी आमदारांच्या मतदारसंघात शासकीय योजना प्रभावीपणे राबवा’; राधाकृष्ण विखे-पाटील यांचे यंत्रणांना आदेश

Subscribe

नाशिक : शासन आपल्या दारी, महाराजस्व अभियान तसेच शासनाच्या विविध योजना मिशन मोडवर घेउन गावागावत शिबीरे राबवा. जिथे भाजपचे आमदार नाही त्या विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघातही या योजना प्रभावीपणे राबवा. कोणी जर यात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर माझा आदेश आहे म्हणून सांगा. विरोधकांच्या कोणत्याही दबावाला बळी पडू नका, काही अडचण आलीच तर थेट मला कळवा अशा सूचना राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल यंत्रणांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन येथे महसूल विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. विखे पाटील म्हणाले, शासनामार्फत राबविल्या जाणार्‍या जनकल्याणकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी शासन आपल्या दारी उपक्रम जिल्ह्यात १५ जून पर्यंत राबविला जाणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी तहसिलदार व मंडळ अधिकारी यांनी गावपातळीवर जनजागृतीसह विविध आवश्यक दाखले व योजनांचे लाभ नागरिकांपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. यासोबतच गावपातळीवरील विविध योजनांची प्रलंबित प्रकरणे येत्या १५ दिवसांत तातडीने निकाली काढण्यात यावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. केंद्र, राज्य सरकारच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत.

- Advertisement -

परंतू या योजनांचा प्रचार, प्रसार होणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकारच्या भूमिकेचा स्विकार करून आपल्याला काम करायचे आहे. याकरीता भाजप पदाधिकार्‍यांची मदत घेण्यात येणार आहे. आठवडयातून चार दिवस प्रत्येक गावात तालुकानिहाय शिबीरे राबवून शासन आपल्या दारी, महाराजस्व अभियान राबवण्याचे आदेश त्यांनी दिले. भाजपचे आमदार त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात हे अभियान राबवतीलच परंतू विरोधी पक्षांच्या आमदारांच्या मतदारसंघातही प्रशासनाकडून या अभियानाचे आयोजन करावे याकरीता भाजप पदाधिकारी समन्वयक म्हणून भूमिका पार पाडतील. त्यामुळे सरकारी योजना राबवतांना विरोधकांच्या दबावाला बळी पडू नका जर कोणी या कामांमध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला तर विखेंचे आदेश आहेत असे स्पष्टपणे सांगा तरीही कोणी अडचण निर्माण केलीच तर थेट मला कळवा बाकीचे मी बघतो असे सांगत त्यांनी प्रशासनानेही योजना राबवतांना चालढकल करू नये असे सांगितले.उपनिबंधक कार्यालयातील एजंटगिरीचा मुददयावरही त्यांनी संबधित विभागाच्या अधिकार्‍यांना सूचित केले. उपनिबंधक कार्यालयात मुद्रांक विक्रेतेच एजंटगिरी करत असल्याचे समोर आले आहे याबाबत तातडीने अ‍ॅक्शन घ्या, कार्यालयात येणारया नागरिकांना मुलभूत सुविधा पुरवण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

दर महिन्याला घेणार आढावा

महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचा आढावा घेतांना आलेल्या तक्रारींबाबत त्यांनी अधिकार्‍यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले. तसेच यापुढे किती तक्रारींचा निपटारा केला याबाबत दर महिन्याला आढावा बैठक घेणार असल्याचे त्यांनी सूचित केले.

- Advertisement -

सारुळ अवैध उत्खननाचा अहवाल प्राप्त, लवकरच कारवाई 

सारुळच्या खाणींचा अहवाल प्राप्त झाला आहे. विभागीय आयुक्तांकडे नगरच्या पथकांने तो सादर केला आहे. त्यानुसार अपेक्षित असलेले सर्वे ऑफ इंडियाद्वारे ड्रोन सर्वेक्षण करावे लागणार आहे. त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. त्यानंतर तेथील उत्खनन आणि रॉयल्टी यांची सांगड घालून संबधित खाण मालकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेणार असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केल्याने आता खाण माफियांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात आवश्यकता भासल्यास विशेष वकील देण्याचीही तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -