घरताज्या घडामोडीबेळगाव भीषण अपघात; आठ ऊसतोड कामगारांचा दुर्देवी मृत्यू

बेळगाव भीषण अपघात; आठ ऊसतोड कामगारांचा दुर्देवी मृत्यू

Subscribe

या अपघातातील १० जणांची प्रकृती गंभीर आहे.

ट्रॅक्टर चालकाच्या बेजबाबदारपणामुळे बेळगावजवळ भीषण अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. या अपघातात आठ ऊसतोड कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत. या जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यापैकी १० जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व मृत व्यक्ती हे बोगुर गावाचे राहणारे आहेत. हा अपघात शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झाला आहे.

खानापूर तालुक्यातील बोगुर गावाजवळील बोगुर इटगी रोडवरील नाल्यात हा ट्रॅक्टर उलटला. या ट्रॅक्टरमधून ऊसतोड कामगार इटगी गावाजवळीच्या बाहेरील रस्त्यावरून येत होते. यादरम्यान चालकाचे ट्रॅक्टवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. बाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत केली.

- Advertisement -

हेही वाचा – Video: भररस्त्यात महिलेला केली अमानुष मारहाण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -