घरमहाराष्ट्रबँकिंग परीक्षेला मुकणार आठ लाख विद्यार्थी

बँकिंग परीक्षेला मुकणार आठ लाख विद्यार्थी

Subscribe

सरकारी बँकांमधील बँकींग अधिकारी आणि क्लार्क या पदांसाठी इन्स्टिट्यूट ऑफ बॅकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) मार्फत भरती करण्यात येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार असली तरी या परीक्षेपासून यंदा अंतिम वर्षाला असलेले आठ लाख विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी संघटनेकडून करण्यात येत आहे.

बँकामधील बँकींग अधिकारी व क्लार्क या पदांच्या भरतीसाठी दरवर्षी इन्स्टिट्यूट ऑफ बॅकिंग पर्सोनेल सिलेक्शनमार्फत जुलैमध्ये घेण्यात येते. परंतु यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी पदवी परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचे निकाल जूनपर्यंत जाहीर होत असल्याने त्यांना ही परीक्षा देता येते. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पदवी परीक्षा न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे यंदा अंतिम वर्षाला असलेले आठ लाख विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहू शकतात. परिणामी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आणखी एक वर्ष थांबावे लागू शकते. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी ऑक्टोबरमध्ये होणार्‍या परीक्षेला अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी देण्यात यावी,  अशी मागणी युवासेना सिनेट सदस्यांकडून इन्स्टिट्यूट ऑफ बॅकिंग पर्सोनेल सिलेक्शनचे अध्यक्ष राजकिरण राय यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे. हे पत्र सिनेट सदस्य प्रदीप सावंत, वैभव थोरात, सुप्रिया करंडे, प्रवीण पाटकर, शशिकांत झोरे यांच्यामार्फत पाठवण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -