आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतरही शिंदे वरळीतून रवाना

Discussion on establishment of power! See photos of Eknath Shinde-Devendra Fadnavis meeting
एकनाथ शिंदे दुपारी एकच्या सुमारास गोव्यातून मुंबई येथे दाखल झाले.

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सरकार अस्थिर करण्यात आले. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने महाविकास आघाडी धोक्यात आली. त्यामुळे संतापलेल्या आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना धमकीवजा इशारा दिला होता. मुंबई विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर विधानभवनात जाणारा रस्ता माझ्याच वरळी मतदारसंघातील रस्त्यांवरूनच जातो असा इशार आदित्य ठाकरेंनी दिला होता. दरम्यान, आज देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी जाताना एकनाथ शिंदे वरळीवरून रवाना झाले. (Ekanth Shinde travel via varali road)

हेही वाचा – विधानसभेत विरोधी पक्षनेते कोण? अजित पवार की जयंत पाटील?

मला मुंबईतील रस्त्यांवर शिवसैनिकांचं रक्त बघायचं नाही, त्यामुळे तुम्ही या बंडखोर आमदारांच्या वाटेत येऊ नका, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी शिवैसनिकांना दिल्या होत्या. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना कोणत्याही प्रकारचा विरोध झाला आहे.

गोव्याहून मुंबईला येताना ते मुंबई विमानतळावर उतरले. तेथून ते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाण्यासाठी वरळी सी-लिंकवरून प्रस्थान केले. सत्ता स्थापनेच्या दृष्टीने फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होणार आहे.

हेही वाचा – फडणवीस, शिंदे यांचा आज सायंकाळी शपथविधी; कोण-कोण घेणार शपथ?

दरम्यान, आज सायंकाळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील. त्यांच्यासमवेत एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्यांच्याकडे महसूल व एमएसआरडीसीचा कार्यभार असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच या दोघांसमवेत एकूण पाच जण शपथ घेतील, असेही सांगितले जात आहे.


सध्याची राजकीय स्थिती पाहता महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष आहे. विधानसभेत राष्ट्रवादीकडे 53 आमदार आहेत. शिवसेनेकडे 55 आमदार असले तरी 39 आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे वेगळा मार्ग स्वीकारला होता. शिंदे गटाचे बंडखोरी केलेले आमदार भाजपबरोबर सरकार स्थापन करणार आहेत. शिंदे गटाने आपणच मूळ शिवसेना असल्याचा दावा केल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात जाऊन पोहोचलेय. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीच्या वाट्याला जाऊ शकते. पण राष्ट्रवादीकडून हे पद कोणाला मिळणार याबाबतही साशंकता आहे.