गुरूपौर्णिमा : हिंदुत्वाशिवाय विचार नाही…., मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बाळासाहेबांसह आनंद दिघेंना अभिवादन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूपौर्णिमेनिमित्त अभिवादन केले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूपौर्णिमेनिमित्त अभिवादन केले आहे. बुधवारी सकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी एकनाथ शिंदे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त ट्वीट करत अभिवादन केलं होतं.

“बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही”, असे या ट्विटमध्ये शिंदे यांनी म्हटले आहे. ट्वीटसोबत एक फोटोही एकनाथ शिंदे यांनी शेअर केला आहे. या फोटोमध्ये बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि आनंद दिघे यांचाही फोटो छापण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांनी नुकतीच बंडखोरी करत खळबळ उडवून दिली होती. शिवसेनेच्या ४० आमदारांचा पाठिंबा मिळवण्यात त्यांना यश आले. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी उद्धव ठाकरेंकडे केली होती. अखेर शिंदेंच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले होते.

ठाण्यात एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघेंच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे गिरवले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळासह आनंदाश्रमात जाऊनही अभिवादन केले होते. त्यानंतर त्यांनी आता ट्वीट करत गुरुपौर्णिमेनिमित्त पुन्हा एकदा अभिवादन केले.


हेही वाचा – काय तो दांडा… सगळं ओके करणाऱ्या मुंबईतील पहिल्या नगरसेविकाच शिंदे गटात