Maharashtra Assembly Election 2024
घरताज्या घडामोडीEkikaran Samiti Melava : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाही; पोलिसांचे आदेश

Ekikaran Samiti Melava : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाही; पोलिसांचे आदेश

Subscribe

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही. महामेळावा घेण्याचा महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा बेळगावचे अतिरिक्त पोलीस महासंचालक एच. हितेंद्र यांनी दिला.

कोल्हापूर : कर्नाटक विधिमंडळाच्या बेळगावमध्ये होणार असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 9 डिसेंबरला मराठी भाषकांचा महामेळावा आयोजित केला जाणार आहे. राज्य सरकारचा विरोध असला तरी कोणत्याही परिस्थितीत हा मेळावा आयोजित केला जाईल असे महाराष्ट्र एकीकरण समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या संबंधी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आले आहे. मात्र आता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही. महामेळावा घेण्याचा महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा बेळगावचे अतिरिक्त पोलीस महासंचालक एच. हितेंद्र यांनी दिला. (karnataka police denied permission to maharashtra ekikaran samiti melava in belgaum.)

हेही वाचा : Mahayuti : मराठवाड्यातील सर्वात ज्येष्ठ आमदाराचे मंत्रिपदासाठी अर्जव; म्हणाले, 40 वर्षे भाजपचा निष्ठावान अन् निष्कलंक 

- Advertisement -

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा करत अधिवेशनाला विरोध दर्शवणार असल्याची माहिती मिळत आहे. या मेळाव्यासाठी परवानगी मिळावी म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिले आहे. मात्र त्यानंतर पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांची बेळगावचे अतिरिक्त पोलीस महासंचालक एच. हितेंद्र यांनी बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महामेळाव्याला परवानगी दिली जाणार नसल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. मागच्या वर्षी देखील महामेळावा आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्राच्या हद्दीत महामेळावा घेतला होता असेही एच.हितेंद्र म्हणाले आहेत.

हेही वाचा : Hindu in Bangladesh : हिंदूंच्या सुरक्षेबाबत युनूस सरकारने जबाबदारी निभवावी; भारताने बांगलादेशला खडसावले

- Advertisement -

कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन हे बेळगावामध्ये होत आहे. त्या माध्यमातून बेळगाववर कर्नाटकचा दावा मजबूत करण्याची खेळी खेळण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. पण महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा सर्वोच्च न्यायालयात असताना बेळगावात अधिवेशन नको असे महाराष्ट्र एकीकरण समितीच म्हणण आहे. त्यामुळेच या अधिवेशनाला विरोध म्हणून दरवर्षी मराठी भाषकांचा महामेळावा आयोजित केला जातो. तसेच कर्नाटक सरकारने जेव्हा 2006 पासून बेळगावमध्ये विधिमंडळाचे अधिवेशन भरवण्यास सुरुवात केली, तेव्हापासून त्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठी भाषकांच्या महामेळाव्याचे आयोजन केले जात आहे.


Edited By Komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -