घरमहाराष्ट्रएकनाथ खडसेंची ईडीकडून साडेसहा तास चौकशी

एकनाथ खडसेंची ईडीकडून साडेसहा तास चौकशी

Subscribe

पुण्यातील भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्येची शुक्रवारी ईडीकडून सुमारे साडेसहा तास चौकशी करण्यात आली. ईडीकडून आपल्यावर कोणताही दबाव नाही. ईडीला सर्व सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी खडसे यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे शुक्रवारी सकाळीच ईडीच्या कार्यालयात गेले. यावेळी त्यांची साडेसहा तास कसून चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांच्या कन्येचीही चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारे खडसे ईडी कार्यालयातून बाहेर पडले. यावेळी मीडियाने त्यांना गराडा घातला असता खडसे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. ईडी मला जेव्हा जेव्हा कागदपत्रे आणि इतर माहितीसाठी बोलावेल तेव्हा तेव्हा मी हजर राहीन. ईडीला सर्व सहकार्य करणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मात्र, आजच्या चौकशीत काय काय विचारणा करण्यात आली, हे सांगणे त्यांनी टाळले.

काय आहे प्रकरण?

खडसे यांनी कुटुंबियांच्या नावे पुण्यातील भोसरी येथे खरेदी केलेल्या जमिनीमुळे ते वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. या प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना फडणवीस सरकारमधील महसूल मंत्रिपद सोडावे लागले होते. नंतरच्या काळात एकनाथ खडसे हे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा पुणे व नाशिक विभाग, प्राप्तीकर विभाग आणि झोटिंग समितीच्या चौकशीला सामोरे गेले होते. मात्र, या तिन्ही यंत्रणांकडून एकनाथ खडसे यांना क्लीन चिट देण्यात आली होती. हा 40 कोटींचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार असल्याचे सांगितले जाते. हे प्रकरण मनी लॉन्ड्रिंगशी असल्याचे सांगितले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -