हे काय घाणेरड्या पद्धतीने बालिशपणाचे राजकारण खेळताहेत, एकनाथ खडसेंची विरोधकांवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधला आहे. सत्तेचा दुरूपयोग करत नियमांची तोडफोड करून राजकारण केलं जात आहे. लढायचं असेल तर ताकदीने लढा, हे काय घाणेरड्या पद्धतीने बालिशपणाचे राजकारण खेळताहेत, असं म्हणत एकनाथ खडसेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीतील भूमिका स्पष्ट करण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर एकनाथ खडसेंनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, जिल्हा दूध संघाची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढवायची असल्याचा निर्णय झाला असून ४१ अर्ज प्राप्त झाले आहेत. मतदारांच्या आमच्या बाजूने मोठा प्रतिसाद आहे.

४५१ पैकी ४४८ सभासदांची मी स्वत: बोललो आहे. सध्यस्थितीत विरोधकांकडून जे राजकारण चाललं आहे. याविषयी जनतेमध्ये मोठी चीड आहे. मंत्री, आमदार, खासदार असतांनाही जिल्हा दूध संघ ताब्यात घेण्यासाठी घाणेरडं राजकारण सुरू आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

जिल्हा दूध संघात भ्रष्टाचार दिसत असेल तर फॉरेन्सिक ऑडीट करा, माझी तयारी आहे. यामध्ये जे निष्पन्न होईल त्याआधारे कारवाई करा. निवडणुका पाहूनच जिल्हा दूध संघातलं प्रकरण समोर आणलं. याला अटक करणं किंवा त्याला अटक कशाला करताहेत, ताकदीने निवडणूक लढा, असं आव्हान खडसेंनी विरोधकांना केलं आहे.


हेही वाचा : ‘ही’ श्रद्धाच त्यांच्या आयुष्याची ताकद ठरली, राज ठाकरेंची बाबासाहेब पुरंदरेंना आदरांजली