घरताज्या घडामोडीकुणाचाही राजीनामा घेणार नाही, कुणीही नाराज नाही - शरद पवार

कुणाचाही राजीनामा घेणार नाही, कुणीही नाराज नाही – शरद पवार

Subscribe

भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादीतील नेते नाराज असल्याची चर्चा होती. उपमुख्यमंत्री अजित पवार खडसेंच्या प्रवेशाने नाराज असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये सुरु होत्या. तसंच खडसेंच्या पक्ष प्रवेशाच्या काही तासांपूर्वी शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात चर्चा झाली. यावरुन बरेच तर्कवितर्क लावण्यात आले. यावर शरद पवार यांनी भाष्य करताना कोणीही नाराज नसल्याचं सांगितलं.

गेले काही दिवस महाराष्ट्रात टीव्हीवर एकच बातमी सुरु होती. नाथाभाऊ. मध्येच कुणी जाहीर केलं की अजितदादा नाराज आहेत. कशाला नाराज आहेत? कोरोनाच्या संकटात सगळ्यांनीच काळजी घ्यायची गरज आहे. आपण लोकांमध्ये राहणारे लोकं आहोत. त्यामुळे वेळप्रसंगी काळजी घ्यायला हवी. राज्य सरकारमध्ये जितेंद्र आव्हाड, संजय बनसोडे, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे या सहकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यासाठी खबरदारी कुणी घेतली तर लगेच काहीतरी गडबड झाली असं नाही. मंत्रिमडळात कोणतेही बदल होणार नाहीत. कुणीही नाराज नाही, असं स्पष्ट शब्दांत शरद पवार यांनी सांगितलं.

- Advertisement -

एकनाथ खडसे यांच्याविषयी बोलताना  येणाऱ्या काळात पुन्हा एकदा जळगाव राष्ट्रवादीच्या विचारांनीच काम करणार आहे हे पुन्हा दिसून येईल. नाथाभाऊंचं एक स्पष्ट आहे. एखादी गोष्ट करायची म्हणजे करायची, मग मागेपुढे बघायचं नाही. नाथाभाऊ राष्ट्रवादीत आल्याने आता पक्षाला गती येईल. नाथाभाऊंनी खान्देशात पक्ष वाढवण्याचा शब्द दिला आहे. जळगावमध्ये राष्ट्रवादी वाढवण्याचा त्यांनी शब्द दिला आहे. त्यामुळे त्यावर शंका बाळगायचं कारण नाही. आता कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यावर आपण जळगावात जाणार असून नाथाभाऊ काय चीज आहे हे दाखवून देणार आहोत, असं पवार म्हणाले.


हेही वाचा – Eknath Khadse Live : मी काही लेचापेचा नाही, त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावीन!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -