घरताज्या घडामोडीहा कसा फुटला, तो कसा फुटला, मुख्यमंत्र्यांची कॅसेट सुरूच; एकनाथ खडसेंची टीका

हा कसा फुटला, तो कसा फुटला, मुख्यमंत्र्यांची कॅसेट सुरूच; एकनाथ खडसेंची टीका

Subscribe

जळगाव जिल्हयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दोन ते तीन वेळा भाषण केले. परंतु भाषणात शिवसेनेतून बाहेर कसे पडलो, गुवाहाटीत कसे गेलो?, अशा एकच प्रकारची कॅसेट मुख्यमंत्र्यांकडून वाजत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, हा कसा फुटला, तो कसा फुटला आणि आपण सरकारमध्ये कसे आलो? यावरच मुख्यमंत्री आपली कॅसेट वाजवत आहेत. जळगाव जिल्ह्यात अनेक समस्या आहेत. परंतु विकासाच्या प्रश्नांवर ते बोलतच नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले.

- Advertisement -

जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी एकनाथ शिंदे हे काहीतरी देतील अशी अपेक्षा होती. मात्र ते देऊ शकले नाहीत. जळगाव जिल्ह्यातले अनेक प्रश्न प्रलंबित असताना दुसरीकडे प्रोत्साहनपर अनुदानातपर्यंत मिळालेले नाही. कर्जमाफीची सुद्धा अंमलबजावणी झालेली नाही. तसेच पीक विमा कंपनीची बोंबाबोंब सुरू आहे. एकंदरीत शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत असताना त्यावर काहीतरी निर्णय होईल अशी अपेक्षा होती, मात्र मुख्यमंत्र्यांचे याकडे दुर्लक्ष आहे, असं खडसे म्हणाले.

पाचोरी तालुक्यातील लोहारी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली. या सभेत विकासाच्या कामावर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी चर्चा केलीच नाही. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करताना कुठल्याही पद्धतीने आचारसंहितेची अडचण नव्हती, असंही खडसे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : राज्यात ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा, छगन भुजबळ यांची मागणी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -