घरमहाराष्ट्रसय्यद शुजावर विश्वास नाही, मनिष भंगाळेवर कसा ठेवला? - खडसे

सय्यद शुजावर विश्वास नाही, मनिष भंगाळेवर कसा ठेवला? – खडसे

Subscribe

भाजपचे सय्यद शुजा हॅकर असल्यामुळे त्याच्या दाव्यांवर विश्वास ठेवता येणार नाही अशी भूमिका घेतलेली असताना एकनाथ खडसेंनी त्यावरून स्वपक्षालाच लक्ष्य केलं आहे.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या इव्हीएम मशीनमधील घोटाळ्यामुळे झाल्याच्या एका हॅकरने केलेल्या दाव्यामुळे सध्या भारतीय राजकारण ढवळून निघत आहे. मात्र, असं असतानाच आता भाजपचेच ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला पुन्हा एकदा खिंडीत पकडणारा सवाल केला आहे. ‘जर भाजपला सय्यद शुजा या हॅकरवर विश्वास नाही, तर मनिष भंगाळेवर कसा विश्वास ठेवला गेला?’ असा प्रश्न खडसेंनी स्वपक्षीय नेतृत्वाला विचारला आहे. त्यामुळे आता भाजप आणखीनच अडचणीत येण्याची शक्यता आहे. जळगावमध्ये एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना खडसेंनी हा सवाल केला आहे.

काय होता सय्यद शुजाचा दावा?

काहीच दिवसांपूर्वी अमेरिकेतील एक हॅकर सय्यद शुजाने भारतीय इव्हीएम अर्थात वोटिंग मशिनबाबत गंभीर आरोप केले होते. ‘इव्हीएम मशिन हॅक करता येऊ शकते’, असा दावा त्याने केला होता. तसेच, ‘२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये इव्हीएम मशिनमध्ये फेरफार करूनच भाजप जिंकलं. गोपीनाथ मुंडेंना याबद्दल कळलं होतं, म्हणून त्यांची हत्या करण्यात आली’, असा खळबळजनक दावा देखील त्यांने केला होता. त्याच्या या दाव्यानंतर भारतीय राजकीय विश्वामध्ये भूकंपसदृश स्थिती निर्माण झाली. काँग्रेसकडून या मुद्द्यावर रान उठवलं जाऊ लागलं. तर, भाजपमधलेच काही अंतर्गत विरोधी गट पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सय्यद शुजाच्या दाव्यांमधली सत्यता पडताळून पाहण्याची मागणी करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंनी केलेलं वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.

- Advertisement -

वाचा – हॅकर, ईव्हीएम आणि राजकारण

खडसे दाऊदच्या संपर्कात खरंच होते का?

काही महिन्यांपूर्वी मनिष भंगाळे नावाच्या एका एथिकल हॅकरने थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे कॉल हॅक केल्याचा दावा केला होता. २०१४ ते २०१५दरम्यानचे दाऊदचे कॉल आपण हॅक केले असून त्यातल्या प्रमुख ४ मोबाईल क्रमांकांपैकी एक मोबाईल क्रमांक एकनाथ खडसे यांच्या नावावर होता’, असा धक्कादायक आरोप मनिष भंगाळेने केला होता. त्यावरून बराच वादंग झाला होता. आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती मेनन आणि अंजली दमानिया यांनी खडसेंवर परखड टीका केली होती. मात्र, आता सय्यद शुजा प्रकरणानंतर खडसेंनी स्वपक्षालाच खडे बोल सुनावले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -