भाजपमध्ये असताना चांगला अन् राष्ट्रवादीत गेल्यावर १ वर्षात ईडी लावता, एकनाथ खडसेंचा खोचक सवाल

मेहनतीने कष्टाने माणसं उभे केली. एकटाच माणूस म्हणून ४० वर्षांपूर्वी वेड्यासारखा फिरत होतो. ३० वर्षापूर्वी एकटा आमदार म्हणून काम करत होतो. त्यानंतर एकाचे दोन झाले. दोनचे चार झाले मग मंत्री आले. विरोधी पक्षनेते झाले गावा-गावात त्या काळात पक्ष पोचला.

eknath khadse slams bjp devendra fadnavis over ed inquiry after enter in ncp
भाजपमध्ये असताना चांगला अन् राष्ट्रवादीत गेल्यावर १ वर्षात ईडी लावता, एकनाथ खडसेंचा खोचक सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर घणाघाती हल्ला केला आहे. भाजपमध्ये ४० वर्ष असताना चांगला होतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यावर १ वर्षात ईडी लावता? असा सवाल खडसेंनी भाजपला केला आहे. तसेच ज्या माणसाच्या मेहनतीमुळे पक्ष उभा राहिला आज त्याचाच तुम्ही अपमान करत आहात. याची फळे तुम्हाला भोगावी लागतील असा इशाराही खडसेंनी दिला आहे. भाजपला तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ४० वर्षांपूर्वी कष्ट केले, मेहनत केली हे सगळ्यांना माहिती आहे. नाथाभाऊंच्या आशीर्वादामुळे अनेक जण मोठे झाले असा टोलाही एकनाथ खसडे यांनी लगावला आहे. जाहीर सभेतून खडसेनी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र डागलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी एका कार्यक्रमात संबोधित करताना भाजपवर हल्लाबोल केला आहे. खडसे म्हणाले की, काम करत असताना भाजपच्या विस्तारासाठी गावपातळीपर्यंत कष्ट केलेत, मेहनत केली हे सगळ्यांना माहिती आहे. अनेक लोकं घडवले आहेत. पक्षाच्या माध्यमातून मोठे केलेत, नाथाभाऊंच्या आशीर्वादाने मोठे झालेत असा टोलाही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. कोणी पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, उपाध्यक्ष, जिल्हा बँकेचे डायरेक्टर झाले. नाथाभाऊंचा आशीर्वाद नसता तर कोणी झाले असते का? असा सवालही खडसेंनी केला आहे.

शेवटपर्यंत प्रयत्न करणाऱ्याचा नाही झाला तर तुमचं काय

मेहनतीने कष्टाने माणसं उभे केली. एकटाच माणूस म्हणून ४० वर्षांपूर्वी वेड्यासारखा फिरत होतो. ३० वर्षापूर्वी एकटा आमदार म्हणून काम करत होतो. त्यानंतर एकाचे दोन झाले. दोनचे चार झाले मग मंत्री आले. विरोधी पक्षनेते झाले गावा-गावात त्या काळात पक्ष पोचला. सामन्या माणसांपर्यंत पक्ष पोहोचवण्याचा प्रयत्न केला. साऱ्या समाजाला एकत्र घेऊन चालण्याची भूमिका ४० वर्ष स्वीकारली आणि ज्या माणसाने शेवटपर्यंत प्रयत्न केले त्याच माणसाचा पक्ष झाला नाही तर तुम्हाला काय होतील असे खडसे म्हणाले.

दुसऱ्या पक्षात गेल्यावर एक वर्षात ईडी लावता

अलीकडचे राजकारण तुम्ही पाहत आहात कोणाच्या मागे ईडीची चौकशी लावली जाते. ४० वर्षे तुमच्यासोबत होतो तर चांगला होतो आणि दुसऱ्या पक्षात गेल्यावर एक वर्षात ईडी लावता. तारखेवर तारखा सुरु करता. ज्या माणसाच्या बळावर तुम्ही उभे राहिलात त्याचा आता अपमान करताय. याची फळे तुम्हाला भोगावे लागतील. जनता तुम्हाला येणाऱ्या काळात माफ करणार नाही असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला आहे.


हेही वाचा : corona Vaccination: 15-18 वयोगटातील मुलांचे लसीकरण मिशन मोडवर, PM मोदी घेणार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक